शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:14 IST

कोलकाता अत्याचार प्रकरणावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी कल्याण बॅनर्ज यांच्यावर टीका केली.

Kalyan Banerjee VS Mahua Moitra: कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अत्याचाराच्या घटनेवर तृणमूल काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. दुसरीकडे टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं. महिलांबद्दलचा द्वेष कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही, फरक एवढाच आहे की टीएमसी अशा घृणास्पद टिप्पण्यांचा निषेध करते, मग त्या कोणीही केल्या तरी, असं मोईत्रा म्हणाल्या. महुआ मोईत्रा यांनी केलेल्या टीकेला खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख केला.

कोलकाता येथील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि आता पक्षाचे आमदार मदन मित्रा यांनी वादग्रस्त विधाने केली. वादग्रस्त विधानांवर टीका करताना खासदार महुआ मोईत्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे कारण तो त्यांच्या नेत्यांनी केलेल्या मूर्खपणाचा निषेध करण्यास मागेपुढे पाहत नाही, असं म्हटलं. मोईत्रा यांना प्रत्युत्तर देताना कल्याण बॅनर्जी यांनी त्यांनी त्यांच्या लग्नावरुन टीका केली.

कल्याण बॅनर्जी यांनी मोइत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली आहे. मोईत्रांनी ४० वर्षांपासून विवाहित असलेल्या पुरुषाचा संसार तोडल्याचे बॅनर्जी म्हणाले. "महुआ तिच्या हनिमूननंतर भारतात परत आली आहे आणि माझ्याशी भांडू लागली आहे. ती माझ्यावर महिलाविरोधी असल्याचा आरोप करते, पण ती स्वतः काय आहे? तिने ४० वर्षांचे लग्न मोडले आहे आणि ६५ वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. तिने त्या महिलेला दुखावले नाही का?" असा सवाल कल्याण बॅनर्जी यांनी केला.

"नीतिनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संसदेतून काढून टाकण्यात आलेली एक खासदार मला उपदेश देत आहे. ती सर्वात मोठी महिलाविरोधी आहे. तिला फक्त तिचे भविष्य कसे सुरक्षित करायचे आणि पैसे कसे कमवायचे हे माहित आहे," असेही कल्याण बॅनर्जी म्हणाले.

दरम्यान, कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धक्कादायक विधान केले होते. घाणेरडी मानसिकता असलेल्या पुरुषांसोबत बाहेर जाण्यापूर्वी महिलेने कोणासोबत जातोय याची काळजी घेतली पाहिजे, असं बॅनर्जी म्हणाले. दुसरीकडे टीएमसीचे आमदार मदन मित्रा यांनीही जर ती विद्यार्थिनी एकटी कॉलेजमध्ये गेली नसती तर ती ही दुर्दैवी घटना टाळू शकली असती, असं म्हटलं.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMahua Moitraमहुआ मोईत्राtmcठाणे महापालिका