शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तिस्ता सेटलवाड यांना दिलासा, अटकेस सुप्रीम कोर्टाची मनाई

By admin | Updated: February 19, 2015 13:22 IST

गुजरात दंगलग्रस्तांसाठी गोळा केलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - गुजरात दंगलग्रस्तांसाठी गोळा केलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीला अटक करण्यास मनाई केली आहे. 
गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी स्मृतीस्थळ उभारण्यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी निधी संकलन केले होते. यातील सुमारे एक कोटी रुपयांचा तिस्ता सेटलवाड व त्यांच्या पतीने अपहार केल्याचा आरोप आहे. गुजरात हायकोर्टाने तिस्ता सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर सेटलवाड यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सेटलवाड व त्यांच्या पतीच्या अटकेस मनाई करणारे आदेश दिले. सेटलवाड यांची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे का असा सवालही सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला विचारला.  सेटलवाड यांनी गुजरात पोलिसांनी देणगीदारांची यादी व संस्थेची माहिती तात्काळ सादर करावे असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. सेटलवाड तपासात सहकार्य करत नसतील तर गुजरात पोलिस त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करु शकतील असेही खंडपीठाने सांगितले.