शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मरकजमध्ये सहभागी झालेल्या 1,548 पैकी 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे - केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 19:13 IST

दिल्लीमध्ये 97 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 24 जण मरकजमधील आहेत. यापैकी 5 जण बरेहोऊन घरी गेले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

ठळक मुद्देमरकजमधून बाहेर काढलेल्यांपैकी 1127 जण क्वारंटीन दिल्लीमधील 97 कोरोना रुग्णांत 24 जण मरकजमधील आतापर्यंत दिल्लीतील 5 जण बरे होऊन घरी परतले आहेत

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात येत आहे. यातच दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीग लोकांच्या मरकजमधून तब्बल 1548 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी तब्बल 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

महत्वाची गोष्ट म्हमणजे दिल्लीमध्ये 97 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 24 जण मरकजमधील आहेत. यापैकी 5 जण बरेहोऊन घरी गेले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

मरकजप्रकरणी केजरीवालांनी व्यक्त केली नाराजी -मुख्यमंत्री अरविंदज केजरीवाल म्हणाले, समोर आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या प्रकरणात अद्याप लोकल कम्यूनिटी ट्रांसमिशन झालेले नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. मात्र, मरकजमधून ज्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यातील जास्तीत जास्त लोक पॉझिटिव्ह असल्याची शक्यता आहे. मरकजमध्ये 12-13 मार्चदरम्यान बाहेरून आलेले लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तेथून ज्यांना काढण्यात आले त्यापैकी 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

दिल्ली सरकारने सोमवारी उपराज्यपालांना मरकजप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात यावी, असे पत्र पाठविले आहे. मला आशा आहे, की लवकरात लवकर याप्रकरणी कारवाईचे आदेश देतील. याप्रकरणात कुण्या अधिकाऱ्याकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जे लोक या कार्यक्रमात होते त्यांनातर कोरोनाचा धोका आहेच, पण जे लोक त्यांच्यासंपर्कात आले त्यांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे, असे केजरीवाल म्हणाले. 

आपण बेजबाबदारपणे वागलो तर अडचणी वाढतील -आतापर्यंत 1548 जणांना मरकजमधून काढण्यात आले आहे. त्यापैकी 1127 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशाप्रकारे लोकांनी एकत्र येणे हा बेजबाबदारपणा आहे. यातील लोक देशाच्या इतर भागांतही गेले आहेत. याचा तेथेही परिणाम होऊ शकतो. मंदिर, मशिदी, गुरुद्वारा बंद असताना, अशा प्रकारे का वागण्यात आले. जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर अडचणी अधिक वाढतील, असेही केजरीवाल म्हणाले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल