शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रूपातील थ्री टियर एसी रेल्वे डबे सफरीसाठी सज्ज

By admin | Updated: November 3, 2016 06:37 IST

नव्या आरामदायी ‘हमसफर’ रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे नव्या आखणीचे व पूर्णपणे नव्या रंग-रूपातील थ्री टियर एसी वर्गाचे डबे सफरीसाठी सज्ज झाले आहेत.

नवी दिल्ली : रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नव्या आरामदायी ‘हमसफर’ रेल्वेगाडीला जोडण्यात येणारे नव्या आखणीचे व पूर्णपणे नव्या रंग-रूपातील थ्री टियर एसी वर्गाचे डबे सफरीसाठी सज्ज झाले आहेत. या महिन्याच्या मध्यात दिल्ली-गोरखपूर मार्गावर पहिली ‘हमसफर’ गाडी धावू लागेल.एसी थ्री टियर हा रेल्वे प्रवाशांचा सर्वात लोकप्रिय वर्ग मानला जातो. म्हणूनच नव्या ‘हमसफर’ गाडीला सर्व डबे याच वर्गाचे जोडण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रेल कोच फॅक्टरीने चार गाड्यांसाठी पुरतील, एवढे डबे तूर्तास तयार केले आहेत. पाचव्या गाडीचे डबे तयार करण्याचे काम सुरू आहे.नव्या रंग-रूपातील असा हा एसी थ्री टियरचा एक डबा सध्या नमुन्यादाखल दिल्लीतील सफदरजंग रल्वे स्थानकात प्रवाशांना पाहण्यासाठी व त्यांची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी आणून उभा करून ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गाडीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून त्या इतर मार्गांवर सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.याआधी लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना थ्री टियर एसी डब्यांचे रूपडे बदलले गेले होते. लालूंनी ‘गरीब रथ एक्स्प्रेस’ नावाची आम जनतेसाठी नवी गाडी सुरू केली आणि त्यात ‘एसी थ्री इकॉनॉमी’ असा पूर्णपणे नवा वर्ग सुरू करण्यात आला. त्यासाठी प्रचलित ‘एसी थ्री टियर’ डब्यांमध्ये फेरबदल केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून त्या डब्यांमध्ये साईड अपर आणि साईड लोअर बर्थच्या मध्ये ‘साईड मिडल’ असा तिसरा बर्थ मध्ये घुसडण्यात आला. परंतु ती रचना अडचणीची असल्याने प्रवाशांमध्ये अप्रिय ठरली व अखेरीस तसे डबे बंद करावे लागले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)डब्याची अंतर्गत रंगसजावट आकर्षक व नेत्रसुखद असेल.त्यात ये-जा करण्याच्या मार्गिकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील.प्रत्येक डब्यात चहा-कॉफी देणारी यंत्रे असतील.प्रत्येक दरवाजाच्या वर जीपीएस आधारित अशी प्रवाशांना उपयुक्त माहिती प्रदर्शित केली जाईल.डब्यात ठिकठिकाणी आग आणि धूरशोधक यंत्रे असतील.साईड बर्थना व मार्गिकांमध्ये पडदे असतील.ठिकठिकाणी स्वचलित रूम फ्रेशनर असतील.सध्या बर्थ क्रमांक व त्यांचा अपर, मिडल व लोअर हा क्रम लोखंडी पट्टीवर स्टेन्सिलने लिहिलेला असतो. त्याऐवजी विमानात असतात तसे स्वप्रकाशित नंबर लावलेले असतील.टॉयलेटच्या भिंती खरवडल्या जाऊ नयेत अथवा त्यावर कोणताही चित्रकारी करता येऊ नये यासाठी त्यांना जेल कोटिंग केलेले असेल.