शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलचे अपहरण करणार्‍या तीन पोलिसांना अटक

By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST

मॉडेलचे अपहरण करणार्‍या तीन पोलिसांना अटक

मॉडेलचे अपहरण करणार्‍या तीन पोलिसांना अटक
पोलीस ठाण्यात विनयभंग : सुटकेसाठी चार लाख उकळल्याचा आरोप
मुंबई : शहरातील पंचतारांकित हॉटेलबाहेरून मॉडेल व तिच्या मित्राचे अपहरण करून पोलीस ठाण्यात आणून तिचा विनयभंग करून साडेचार लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तीन पोलिसांसह सहाजणांना गुरूवारी गजाआड करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे.
बुधवारी या मॉडेलने पोलीस आयुक्त राकेश मारिया सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेत घडला प्रकार सांगितला. तेव्हा मारिया यांनी तात्काळ गुन्हे शाखा, एमआयडीसी युनीटच्या वरिष्ठ निरिक्षक गोपिका जहागिरदार यांना बोलावून घेत या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला.
ही घटना ३ एप्रिलला साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉलीडे इन हॉटेलमध्ये घडली. या मॉडेलला तिच्या कॉऑर्डीनेटर महिलेने हॉटेलमध्ये २ लाख रूपयांची रोकड आणण्यासाठी पाठवले होते. ती तेथे गेली तेव्हा संबंधीत व्यक्तीने(पैसे देणार्‍या) तिला हॉटेलच्या खोलीत बोलावले. तिला संशय व भीती वाटल्याने तिने खोलीत जाण्यास नकार दिला. तसेच मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. मित्र आल्यानंतर ते दोघे हॉटेलबाहेर पडले. मात्र त्याचवेळी तेथे एक खासगी गाडी धडकली. त्यातून खाली उतरलेल्या तीन तरूणांनी या दोघांना ताब्यात घेतले, गाडीत कोंबले व साकिनाका पोलीस ठाण्यात आणले. या सहाजणांमध्ये एपीआय खटापे, एपीआय सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई कोदे यांचा सहभाग होता. उर्वरित तिघांमध्ये महिला व दोन तरूण होते, असे पिडीत मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे़
पोलीस अधिकार्‍यांनी मॉडेलवर वेश्या तर तिच्या मित्रावर दलाल असल्याचा आरोप केला. तिचे दागिने काढून घेतले. या दरम्यान तिचा विनयभंग केला. तसेच गुन्हा न नोंदविण्यासाठी व सुटकेसाठी मित्राकडून साडेचार लाख रूपये उकळले, असा आरोप आहे.
मॉडेलने केलेला आरोप गंभीर आहे. दोन अधिकार्‍यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, पोलीस दलाची बदनामी होऊ नये यासाठी कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सहआयुक्त देवेन भारती यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)