शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 11:19 IST

कुंभमेळ्याच्या आयोजनावर भाष्य करत मोदींची नेहरुंवर टीका

कौशांबी (उप्र): पंडित जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते कौशांबीत एका जाहीर सभेत बोलत होते. नेहरुंनी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो नागरिकांनी प्राण गमावला. मात्र सरकारची आणि नेहरुंची नाचक्की टाळण्यासाठी त्यावेळी हे वृत्त दाबण्यात आलं, असा दावा मोदींनी केला. यंदा कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले. पंतप्रधान स्वत: आले. मात्र कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. कोणाचाही मृत्यू झाला नाही. सरकार बदलल्यावर व्यवस्था कशी बदलते, याचं हे उदाहरण असल्याचं मोदी म्हणाले. 'नेहरु कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी तर फारशी गर्दीदेखील नव्हती. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तरीही चेंगराचेंगरीचं वृत्त दाबण्यात आलं. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एक रुपयादेखील दिला गेला नाही. केवळ चेंगराचेंगरीच नव्हे, तर त्यानंतरदेखील जे घडलं ते अतिशय असंवेदनशील होतं. अन्यायकारक होतं,' असं मोदी म्हणाले. मी अनेकदा कुंभमेळ्याला भेट दिली आहे, असं मोदींनी सांगितलं. 'जेव्हा सरकार बदलतं, तेव्हा नियत बदलते आणि त्यानंतर परिणाम दिसू लागतात. प्रयागराजनं यंदा हे अनुभवलं. आधी या ठिकाणी कुंभमेळा व्हायचा, तेव्हा आखाड्यावरुन वाद व्हायचे. भ्रष्टाचार झाल्याची चर्चा व्हायची. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यानं सर्वांची मान अभिमानानं उंचावली. एकही आरोप झाला नाही. ज्यांनी या मेळ्यात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली, त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात अतिशय आदराची भावना आहे. त्यांनी कुंभमेळ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रतिमा बदलली,' असं मोदींनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश