शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेतील साठलेल्या पाण्यात हजारो भाविकांचे स्नान संसर्गाचा धोका : नगरपरिषदेकडून संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी नाहीच

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

१०पंड०९,१०

१०पंड०९,१०
चंद्रभागेच्या पात्रातील सखल भागात थांबलेले पाणी, शेजारी प्रचंड गलिच्छ कचरा आणि त्याशेजारीच स्नान करणारे भाविक दिसत आहेत.
पंढरपूर : चंद्रभागा नदीपात्रातील सखल भागात केवळ गुडघाभर पाणी आहे तरी दररोज शेकडो भाविक त्या डबक्यांमध्ये स्नान करत असल्याने भाविकांना त्वचारोगाच्या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.
अधिक मासानिमित्त पंढरपुरात दररोज हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. दोन दिवस थांबून येथे भजन-कीर्तन करुन चंद्रभागेत स्नान करण्यासाठी ते नदीवर मोठ्या आशेने येतात, मात्र नदीत पाणीच नसल्याने नदीपात्रात जिथे कुठे साठलेले पाणी आहे त्याच पाण्यात स्नान करून परंपरा जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
याच पाण्यात आंघोळ करून पुन्हा त्याच पाण्यात कपडे धुवायचे वाळवंटात वाळवायचे असा प्रकार चालतो. अनेक वेळा हे कपडे तसेच वाळवंटात टाकून दिले जातात, त्यामुळे ते कपडे पाण्यात व चिखलात पडून कुजतात आणि त्याचीच सर्वाधिक घाण चंद्रभागेत साठून राहिलेली दिसते. विशेषत: पुंडलिक मंदिराच्या समोरच्या बाजूला अशा कुजलेल्या कपड्यांचा खच पडलेला दिसतो.
शिवाय चंद्रभागेच्या पाण्याची पूजा करण्यासाठी हळद-कुंकवासह दिवे सोडून पूजा करण्यात येते. त्यामुळे पूजेतील निर्माल्याचाही मोठा खच साचून नदीपात्राला अक्षरश: डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे डास व चिलटांचे प्रमाण वाढले आहे.
---
कोट :::::::::::::::::::::::
भाविकांनी पाण्यात आंघोळ करू नये, असे आवाहन केले आहे तरी देखील भाविकांची श्रध्दा लक्षात घेऊन पंढरपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या बंधार्‍यातून दोन दिवसांपूर्वी पॉईंट पंधरा सेंटिमीटर इतके पाणी सोडले आहे. त्यामुळे तितके पाणी तरी किमान वाहते झाले आहे. मात्र तरी देखील या पाण्यातून त्वचा रोगाचा धोका संभवतो हे सत्य असल्याने भाविकांनी उजनीतून पाणी येईपर्यंत या साठलेल्या पाण्यात स्नान करु नये.
-शंकर गोरे,
मुख्याधिकारी,
पंढरपूर, नगरपरिषद, पंढरपूर