सोने ठेवा, कर्ज द्या... म्हणणाऱ्यांनी केला विक्रम, बुडीत कर्जांची रक्कमही विक्रमी पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:33 IST2025-08-26T07:33:26+5:302025-08-26T07:33:56+5:30
Gold Loan: देशात सोन्यावरील कर्जाचा आकडा १२ लाख कोटींवर पोहोचला असून, हा एक नवा विक्रम आहे. मात्र, बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांनी दिलेल्या सोन्यावरील कर्जातील बुडीत कर्जेसुद्धा (एनपीए) विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत.

सोने ठेवा, कर्ज द्या... म्हणणाऱ्यांनी केला विक्रम, बुडीत कर्जांची रक्कमही विक्रमी पातळीवर
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - देशात सोन्यावरील कर्जाचा आकडा १२ लाख कोटींवर पोहोचला असून, हा एक नवा विक्रम आहे. मात्र, बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांनी दिलेल्या सोन्यावरील कर्जातील बुडीत कर्जेसुद्धा (एनपीए) विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत.
कर्ज आणि एनपीए वाढले असले तरी, ७५% एलटीव्ही (लोन टू व्हॅल्यू) गुणोत्तर कर्जाच्या संपूर्ण कालावधीत राखणे आवश्यक आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत लोकसभेत राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला होता.
बुडीत कर्जांचा (एनपीए) वाढता आकडा