शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:02 IST

यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित ठरली.

आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे ९३५ जणांचे प्राण गेले, तर ५७० जणांचा मृत्यू वीज कोसळणे व मेघगर्जनेसारख्या घटनांमुळे झाला.

कुठे, किती पाऊस झाला?

१. देशभरात यंदा ९३७.२ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त आहे. पूर्व व ईशान्य भारतात मात्र २० टक्के कमी पाऊस झाला. येथे केवळ १,०८९.९ मिमी पाऊस पडला, जो १९०१ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस आहे.

२. उत्तर-पश्चिम भारतात ७४७.९ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा २७.३ टक्के जास्त आहे. पंजाबमध्ये दशकांतील सर्वांत मोठा पूर आला.

राज्यनिहाय परिस्थिती

> मध्य प्रदेशात २९० मृत्यू नोंदले गेले, त्यापैकी १५३ जण अतिवृष्टी व पुरामुळे, तर १३५ जण वीज कोसळून मृत्युमुखी पडले.> हिमाचल प्रदेशात १४१ जणांचा बळी गेला. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलन व अचानक आलेल्या पुराचा हा मुख्य परिणाम होता.> जम्मू-काश्मीरमध्ये १३९ मृत्यू, तर महाराष्ट्रात १३५ मृत्यू, प्रामुख्याने पुरामुळे झाले.> उत्तर प्रदेशात २०१ मृत्यू, त्यापैकी ११२ वीज कोसळल्यामुळे व ६९ अतिवृष्टीमुळे झाले.> झारखंडमध्ये १२९ मृत्यू, त्यापैकी ९५ वीज कोसळून झाले.> बिहारमध्ये ६२ जणांचा मृत्यू, सर्व वीज कोसळण्यामुळे झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Monsoon Mayhem: Heavy Rains, Floods Claim 1,528 Lives in India

Web Summary : This monsoon season's extreme weather events, including floods and lightning, caused 1,528 deaths across India, according to the India Meteorological Department. Madhya Pradesh, Himachal Pradesh, and Maharashtra were the worst-hit states. The country received 8% more rainfall than average, with eastern regions experiencing significant deficits.
टॅग्स :floodपूरRainपाऊसIndiaभारतDeathमृत्यू