Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:47 IST2025-05-19T12:44:59+5:302025-05-19T12:47:59+5:30
Jyoti Malhotra : हिसारच्या ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी हेरगिरीचा संशय वाढत चालला आहे. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी तिचा संपर्क वाढला होता.

Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
Jyoti Malhotra ( Marathi News ) : हेरगिरी आणि भारतीय गुप्तचर माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली हरयाणातील नूह आणि हिसार येथील तरुण अरमान आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा यांना अटक करण्यात आली आहे. अचानक केलेल्या अटकेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेचा संशय झपाट्याने वाढत होता. यासाठी एक-दोन कारणे नव्हती. ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती आणि पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते, यामुळेच यंत्रणेचा संशय वाढला.
पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा लगेच मिळत नाही. व्हिसा घेण्यासाठी मोठी प्रोसेस असते. पण, ज्योती मल्होत्राला व्हिसाही लगेच मिळाला. याशिवाय ती लग्जरी जीवन जगत होती. या सर्व गोष्टींमुळे तपास यंत्रणांना ज्योतीवर संशय आला आणि ती रडारवर आली.
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
न्यू अग्रसेन कॉलनीतील रहिवासी ज्योती मल्होत्राने कोरोना काळात तिचे यूट्यूब चॅनल सुरू केले. सुरुवातीला ती स्थानिक व्हिडीओ अपलोड करायची. ज्यावेळी ती शहराबाहेर पडली तेव्हा तिने देशातील मंदिरांसह परदेशांना भेटी दिल्या. २०२३ नंतर, देशाचे पाकिस्तानशी संबंध सुधारले, त्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत मैत्री वाढवली.
पाकिस्तानसोबतच तिला चीनचा व्हिसाही सहज मिळाला. भारताचे चीन आणि पाकिस्तानशी असलेले संबंध सर्वांना माहीत असूनही ज्योतीला सहज व्हिसा मिळाल्याने ती तपास यंत्रणेच्या रडारवर आली. त्यानंतर, पाकिस्तानला गेल्यानंतर, ज्योतीने त्या देशाबद्दल पॉझिटीव्ह माहिती दिली.
ती तिथली परिस्थिती भारतीय दृष्टिकोनातून अधिक चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत होती. ज्योतीची पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशशी जवळीक असल्याने तपास यंत्रणांचा संशय अधिकच वाढला.
लक्झरी लाईफ संशयाचे कारण
ज्योतीचे लग्झरी लाईफ तपास यंत्रणेसमोर आले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. काही दिवसापूर्वीच ती बाली येथे गेली होती.
ती ज्यावेळी बाली येथे गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत एक पाकिस्तानी अधिकारीही होता, अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये तिने पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला होता.