महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 06:13 IST2024-10-25T06:13:19+5:302024-10-25T06:13:53+5:30

"महाविकास आघाडीच्या सरकारला कटकारस्थान रचून पाडण्याचे काम करण्यात आले"

This is the real time to teach a lesson to the grand alliance government; Vinesh Phogat's attack on the Mahayuti | महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात

महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्क, तिवसा (जि. अमरावती): खेळाडू असल्याने मी एक गोष्ट शिकले. ज्या व्यक्तीची नाळ सामान्य माणसाशी जुळली असते, जो तुमच्या सुखातच नाही दु:खातही सहभागी होतो. तोच या देशाचे भवितव्य घडवू शकतो. महाविकास आघाडीच्या सरकारला कटकारस्थान रचून पाडण्याचे काम करण्यात आले. या सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे, अशी टीका कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांनी केली. मविआच्या उमेदवार आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा येथील सभेत त्या बोलत होत्या.

महायुतीचे कारस्थान

फोगाट म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींना पराभूत करण्यासाठी महायुती सरकार कटकारस्थान रचत आहे. मात्र, विकासासाठी सतत झटणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही. एकीकडे दोन मोठे राजकीय पक्ष संविधान तोडण्याचे काम करीत आहेत, तर दुसरीकडे आम्ही संविधान वाचविण्यासाठीचा लढा उभारला आहे, असे म्हणत आमदार ॲड. ठाकूर यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.

Web Title: This is the real time to teach a lesson to the grand alliance government; Vinesh Phogat's attack on the Mahayuti