शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

तुरुंगातील कोविड उपचार केंद्रातून १३ कैदी पसार, शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:04 AM

रेवाडीचे पोलीस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी सांगितले की, हरियाणातील विविध तुरुंगातील कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी या ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

चंदीगड :  हरियाणातील रेवाडी तुरुंगातील कोविड - १९ उपचार केंद्रातून १३ कैदी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली असून, रेवाडी पोलीस नरनौलसह शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय साधून आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.शनिवारी आणि रविवारदरम्यानच्या रात्री ही घटना घडली.  रेवाडी तुरुंगातील एका विशेष कक्षातील या कैद्यांनी बराकीची लोखंडी जाळी कापली.  पळ काढण्यासाठी त्यांनी अंथरुण - पांघरुणांच्या दोरीचा वापर केला. राज्यातील  कोविड-१९ ग्रस्त कैद्यांसाठी  सध्या या तुरुंगाचे रुपांतर कोविड समर्पित उपचार केंद्रात करण्यात आले आहे. राज्यातील विविध भागातील ४९३  कोरोनाबाधित कैद्यांनी रेवाडी तुरुंगातील विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. रेवाडीचे पोलीस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी सांगितले की, हरियाणातील विविध तुरुंगातील कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी या ठिकाणी हलविण्यात आले आहे. चौकशीचे आदेश- रेवाडी आणि महेंद्रगढमधील  खून, चोरी, बलात्काराचे गुन्हे असलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे.  त्यांना  नरनौल तुरुंगातून रेवाडी येथे आणण्यात आले होते.- सकाळी कैद्यांची नियमित हजेरी घेताना तेरा कैदी बेपत्ता असल्याचे आढळले, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. - याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तुरुंग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसPrisonतुरुंग