काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:08 IST2018-12-19T20:08:09+5:302018-12-19T20:08:59+5:30

गेल्या आठवड्यात लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक राज्य गमावले.

In the third state of Congress, debt waiver; Farmers waive debt of 2 lakh | काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

जयपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्तेत येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या काँग्रेसने आता तिसरे राज्य राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. 


गेल्या आठवड्यात लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक राज्य गमावले. मात्र, भाजपशासित तीन राज्ये ताब्यात घेतली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रचारावेळी राज्यांना वेगवेगळी आश्वासने दिली होती. मात्र, निवडून आल्यानंतर जिंकलेल्या तिन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. 




राजस्थानमध्ये आज काँग्रेस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 18 हजार कोटींचा बोजा पडणार असून तो सहन केला जाईल असे सरकारने स्पष्ट केले. 
 

Web Title: In the third state of Congress, debt waiver; Farmers waive debt of 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.