शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"बॅटही पकडता न येणाऱ्यांना कशाला घेता?"; SC कडून रोहित पवारांची कानउघाडणी, MCA निवडणुकांवरील स्थगिती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला मोठा फ्रॉड करण्यापासून रोखलं आहे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

Supreme Court on MCA Body Polls: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवत, सुप्रीम कोर्टाने एमसीएच्या कारभारावर अत्यंत कडक ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने तुम्हाला मोठा गैरव्यवहार करण्यापासून रोखले आहे, अशा शब्दांत न्यायालयाने एमसीएला आणि एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांना फटकारले आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एमसीएने या निवडणुकीवरील स्थगिती हटवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. "मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी तुम्हाला मोठा फ्रॉड करण्यापासून रोखले आहे. आम्हाला अजून बोलायला लावू नका," अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने फटकारले. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असून तिथेच आपली बाजू मांडावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

यादीमध्ये ज्यांना बॅट कशी पकडायची माहिती नाही त्यांची नावे - सुप्रीम कोर्ट

एमसीएकडून असलेल्या ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निर्णय चुकीचा होता, असं म्हटलं.  त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी,  "या देशाने निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले आहेत. जर तुमच्या या (मतदार) यादीत त्यापैकी काही खेळाडू असते, तर आम्ही कदाचित हे चालू दिले असते. पण तुमच्या यादीत असे लोक आहेत ज्यांना बॅट कशी पकडायची हे सुद्धा माहित नाही. आम्हाला यापेक्षा जास्त बोलायला लावू नका. दिग्गज खेळाडूंकडे पहा. किमान इतका तरी सन्मान त्यांना दिला पाहिजे की त्यांनी असोसिएशनचा कारभार पाहावा. जर क्रिकेटपटूंसाठी नसेल, तर मग ही असोसिएशन नेमकी आहे तरी कोणासाठी?" असा सवाल केला.

नेमकं प्रकरण काय? 

मुंबई उच्च न्यायालयाने ६ जानेवारी रोजी एमसीएच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी, अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ४०० नवीन सदस्यांना बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि इतर सदस्यांनी या निवडणुकांविरोधात याचिका दाखल केली होती. केदार जाधव यांच्या याचिकेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते.

नवीन सदस्य म्हणून रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांच्यासह ३० हून अधिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे अचानक घुसवण्यात आली. या सदस्यांची नोंदणी करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही आणि इतक्या मोठ्या संख्येने सदस्य वाढवून मतदारांची यादी बदलण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे आता एमसीएला मुंबई उच्च न्यायालयातच आपली बाजू सिद्ध करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाने आधीच सांगितले आहे की, ४०० नवीन सदस्य अचानक वाढवणे ही बाब पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. यामुळे एमसीएच्या आगामी निवडणुका आता कायदेशीर कचाट्यात अडकल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Rejects MCA Polls Stay Removal; Criticizes Voter List

Web Summary : The Supreme Court upheld the stay on MCA elections, criticizing the inclusion of members unfamiliar with cricket. The court questioned the integrity of adding 400 new members before polls, echoing concerns of unfair practices raised in a petition.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRohit Pawarरोहित पवारKedar Jadhavकेदार जाधवNCPराष्ट्रवादी काँग्रेस