कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:29 IST2025-11-21T15:24:25+5:302025-11-21T15:29:26+5:30
डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
कर्नाटककाँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धारामय्या असे दोन गट आहेत. डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी अनेक महिन्यांपासून नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. दरम्यान, आता या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. डीके शिवकुमार यांचे समर्थक आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. डीके शिवकुमार यांच्यासह कर्नाटकचे एकूण १० आमदार दिल्लीत आहेत.
दरम्यान, आता डीके शिवकुमार यांचे समर्थक आमदार इक्बाल हुसेन यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांना आश्वासन मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे. खरगे यांनी त्यांना सर्व काही ठीक होईल असे आश्वासन दिले आहे.
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
आमदार हुसेन म्हणाले की, खरगे यांनी डीके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. ते आता म्हणतात की ते या विषयावर हायकमांडशी चर्चा करतील आणि सर्व काही ठीक होईल. हुसेन पुढे म्हणाले की, खरगे यांनी सांगितले होते की त्यांना हायकमांडशी यावर चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच ते भाष्य करतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे. आतापर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व या विषयावर मौन बाळगून आहेत.
तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते या नाराजीतून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा आहेत.
अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता
कर्नाटकातील डीके शिवकुमार यांचे समर्थक आणखी काही आमदार दिल्लीला पोहोचू शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, नेतृत्वाच्या पहिल्या अडीच वर्षांनंतर सिद्धरामय्या बाजूला होतील, यामुळे शिवकुमार यांना संधी मिळेल, यावर एकमत झाले होते, असा दावा डीके शिवकुमार समर्थकांनी केला आहे. यामुळे आता कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत.