होणाऱ्या जावयानंतर भावोजीसोबत पळालेली महिला अखेर आली समोर, म्हणाली, मी पळून गेले नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:54 IST2026-02-13T11:53:41+5:302026-02-13T11:54:12+5:30
Aligarh Women Relationship Case: होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली अलिगड येथील महिला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही महिला आता तिच्या भावोजीसोबत पसार झाल्याचा दावा तिच्यासोबत राहत असलेल्या जायवायने केला होता. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून जायवासोबत पत्नीप्रमाणे राहणारी ही महिला सर्वासमोर आली आहे.

होणाऱ्या जावयानंतर भावोजीसोबत पळालेली महिला अखेर आली समोर, म्हणाली, मी पळून गेले नाही तर...
मुलीच्या लग्नाला काही दिवस उरले असतानाच होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली अलिगड येथील महिला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही महिला आता तिच्या भावोजीसोबत पसार झाल्याचा दावा तिच्यासोबत राहत असलेल्या जायवायने केला होता. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून जायवासोबत पत्नीप्रमाणे राहणारी ही महिला सर्वासमोर आली असून, तिने आपण पळून गेले नव्हते, तर आपल्याला फसवण्यात आले, असा दावा करत सोबत पतीप्रमाणे राहत असलेल्या जावयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सासू आणि जावयामधील ही प्रेमकहाणी वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे.
गेल्यावर्षी होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्यानंतर त्याच्याबरोबर पत्नीप्रमाणे राहिलेल्या महिलेवर तिच्यासोबत पतीप्रमाणे राहणाऱ्या जावयानेच गंभीर आरोप केले होते. ही महिला २ लाख रुपये आणि दागिने घेऊन भावोजीसोबत पळून गेली असा आरोप त्याने केला होता. या आरोपानंतर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या या महिलेने सांगितले की, मी कुणासोबतही पळून गेलेले नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. सुरुवातीला सर्व काही चांगलं होतं. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली. राहुल (जावई) मला बंदीवानासारखं ठेवू लागला. तो मला कुठे येऊ-जाऊ देत नव्हता. एवढंच नाही तर मला गुंगीची औषधं द्यायचा. त्याने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मी माझ्यासोबत जी रोख रक्कम आणि दागिने आणले होते, ते सर्व त्याने खर्च करून टाकले. आता माझ्यावरच उलटे आरोप करत आहे, असा दावा या महिलेने केला.
ती पुढे म्हणाली की, मी खूप खटपट करून त्याच्या तावडीतून सुटून इथे आले आहे. आता तो मला बदनाम करत आहे. आता मला न्याय हवा आहे. तसेच सत्य समोर आलं पाहिजे. माझ्याविरोधात एक कहाणी रचून सांगितली जात आहे. ती पूर्णपणे एकतर्फी आहे. तसेच मी चुकीचं वागले असते तर स्वत: पोलीस ठाण्यात आले नसते, असेही या महिले सांगितले.