उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 21:51 IST2025-10-23T21:47:01+5:302025-10-23T21:51:39+5:30
Rajasthan News: राजस्थान प्रशासकीय सेवेतील अधिकारी एसडीएम छोटुलाल शर्मा हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता त्यांच्या कुटुंबातील एक वाद समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे.

उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ
राजस्थान प्रशासकीय सेवेतील अधिकारी एसडीएम छोटुलाल शर्मा हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता त्यांच्या कुटुंबातील एक वाद समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसडीएम छोटूलाल शर्मा यांनी त्यांची खरी पत्नी पूनम शर्मा आणि मुलांना रात्री घराबाहेर काढले. मारहाण करून घराबाहेर काढण्यात आल्यानंतर आता पूनम शर्मा आणि मुलांना वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पूनम शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दुसरीकडे दीपिका व्यास नावाची महिला आपण छोटूलाल शर्मा यांची पत्नी असल्याचा दावा करत समोर आली आहे. पेट्रोल पंप वादामध्ये याच महिलेनं अर्ज दिला होता, असं सांगितलं जात आहे. तर तर दीपिका व्यास ही खोटा दावा करून स्वत:ला एसडीएम शर्मा यांच्या पत्नीच्या रूपात उभी करत असल्याचा आरोप पूनम शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, छोटुलाल शर्मा हे आधीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. २०१७ मध्ये भीलवाडा पंचायत समिती अधिकारी गिरिराज मीणा यांच्यासोबत भांडण झाल्यानंतर आणि २०१८ मध्ये लाचखोरीच्या वादानंतर त्यांना हटवण्यात आले होते. आता त्यांता नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच अशा अधिकाऱ्यावर आतापर्यंत कठोरात कठोर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल विचारला जात आहे.