वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 23:23 IST2025-08-09T23:15:10+5:302025-08-09T23:23:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहेत. यातील एक गाडी महाराष्ट्रातही सुरू होणार आहे.

वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
देशात आणखी तीन नवीन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (१० ऑगस्ट) या एक्स्प्रेस गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहेत. यातील पहिली वंदे भारत रेल्वे बंगळुरू बेळगाव वंदे भारत, माता वैष्णो देवी कटरा-अमृतसर वंदे भारत आणि नागपूर-पुणे वंदे भारत अशा तीन नवीन गाड्या सुरू धावणार आहेत. वैष्णो देवीला जाण्यासाठी नवीन वंदे भारत सुरू होणार असल्याने दर्शनाला जाणे आणखी सुकर होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन वंदे भारत १० ऑगस्टपासून सुरू होत आहेत. या वंदे भारत गाड्यांमुळे देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या १५० वर पोहचेल. तर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून ६.३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी यातून प्रवास केला आहे.
नवीन वंदे भारत ट्रेनचे मार्ग कोणते?
केएसआरबंगळुरू-बेळगाव वंदे भारत - बंगळुरूवरून सुटणार धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगरे, तुमकूर, यशवंतपूर आणि बेळगाव.
नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत ट्रेन - वर्धा, बडनेर, शेगाव, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, नागपूर.
वैष्णो देवी कटरा-अमृतसर वंदे भारत
कटरा, जम्मू तावी, पठाणकोट कॅन्टोमेंट, जालंधर, ब्यास, अमृतसर.
महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत ट्रेनची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन १२ झाल्या असून, त्यांच्या फेऱ्या २४ वर पोहचल्या आहेत.
पुणे-नागपूर वंदे भारतचं होणार स्वागत
अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन मार्गे पुण्याला पोहचणार आहे. त्यासाठी नमूद प्रत्येक ठिकाणी तिच्या स्वागताची तयारी करण्यात आल्याची माहिती आहे.
वंदे भारत ट्रेनची रचना
लक्झरी आणि सेमी हायस्पीड अशी ही गाडी प्रारंभी ८ कोच घेऊनच धावणार आहे. ज्यात १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी) आणि ७ चेअर कार (सीसी) यांचा समावेश आहे. ईसी कोचमध्ये ५२ प्रवासी, ५ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ७८ प्रवासी आणि लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ४४ अशा प्रकारे या गाडीत एकूण ५३० प्रवासी बसू शकतात.