The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:38 AM2022-03-19T08:38:50+5:302022-03-19T08:39:37+5:30

The Kashmir Files Film: काश्मीर फाईल्स चित्रपटावर ओमर अब्दुल्ला यांनी दिली प्रतिक्रिया. चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवल्याचा केला आरोप.

the kashmir files jammu kashmir former cm omar abdullah reaction on kashmiri pandit vivek agnihotri film makers | The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

Next

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. असं असलं तरी या चित्रपटावरून दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.

"द काश्मीर फाईल्स या चित्रपटात अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. जेव्हा काश्मिरी पंडीत या ठिकाणाहून गेले तेव्हा फारुक अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळ या ठिकाणी राज्यपालांचं शासन होतं आणि देशात भाजपचं समर्थन असलेल्या व्ही.पी. सिंह यांचं सरकार होतं," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.


"हा एक चित्रपट आहे ती डॉक्युमेंट्री हे स्पष्ट नाही. ज्यांना पलायन करावं लागलं आणि मृत्यू झाला त्यात काश्मिरी पंडीत एकटे नव्हते. त्यात मुस्लीम आणि शीख लोकांचाही मृत्यू झाला. त्यांनाही काश्मीरमधून पलायन करावं लागलं होतं आणि ते आतापर्यंत परतू शकले नाही," असंही ते म्हणाले. "नॅशनल कॉन्फरन्सनं काश्मिरी पंडीतांना परत आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि सुरू आहेत. जर असे चित्रपट बनवले गेले तर हे लोक परत येणार नाहीत याची खात्रीच निर्माते करत आहेत असं वाटतं. काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या निर्मात्यांना काश्मिरी पंडितांचे पुनरागमन नको असल्याचं दिसतंय," असंही अब्दुल्ला म्हणाले.

Web Title: the kashmir files jammu kashmir former cm omar abdullah reaction on kashmiri pandit vivek agnihotri film makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.