अहमदाबादएअर इंडियाविमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंजिन बंद पडणे, हे या अपघातामागील मुख्य कारण असल्याचे आढळून आले आहे. आता, इंधन स्विच अथवा 'फ्यूल स्वीच' संदर्भातही माहिती समोर येत आहे. अपघातादरम्यान इंधन नियंत्रण स्विच अथवा (फ्यूल कंट्रोल स्वीच) RUN वरून CUTOFF वर गेल्याचे, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडियाच्या (AAIB) अहवालातून समोर आले आहे. मात्र, हे कसे घडले, याची माहिती मिळालेली नाही.
अहमदाबादएअर इंडियाविमान अपघाताच्या शेवटच्या क्षणांसंदर्भात बोलायचे झाल्यास, ते क्षण अत्यंत भयावह होते. या विमानाने 07:48:38 UTC वर Bay 34 मधून बाहेर पडायला सुरुवात केली आणि यानंतर ते रनवे 23 वर लाइनअप करण्यात आले. 08:07:33 UTC वर टेकऑफची मंजुरी मिळाली. विमान 08:07:37 UTC वाजता धावपट्टीवर धावू लागले. यानंतर काही वेळातच ते क्रॅश झाले. विमानात असलेल्या 242 प्रवाशांपैकी 241 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर दैव बलवत्तर होते म्हणून एकाच जीव वाचला.शेवटच्या क्षणात नेमकं काय घडलं? -फ्लाइट टेकऑफनंतर, काही वेळातच दोन्ही इंजिनचे फ्यूल कटऑफ स्विच RUN वरून CUTOFF वर गेले, आधी एक आणि नंतर दुसरेही बंद झाले. यात केवळ एका संकंदाचेच अंतर होते. यामुळे दोन्ही इंजिनचे इंधन बंद झाले आणि त्यांचा वेग झटक्यात कमी झाला. वेग कमी झाल्याने विमान खाली आले आणि मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले आणि शेवटच्या केवळ 3 सेकेंदांतच सर्व काही होत्याचे नव्हते झाले.कोण उडवत होतं विमान -हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते, विमानाच्या उड्डाणाची वेळ दुपारी १:१० वाजताची होती. पायलट आणि सह-पायलट अथवा को-पायलट मुंबईचे होते आणि एक दिवस आधीच अहमदाबादला पोहोचले होते. सह-पायलट बोईंग ड्रीमलाइनर ७८७-८ उडवत होता आणि मुख्य पायलट देखरेख करत होते. पायलटचे नाव सुमित सभरवाल आणि सह-पायलटचे नाव क्लाईव्ह कुंदर असे होते. संबंधित स्विच संदर्भात या दोघांमध्ये संभाषण झाले होते.