बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:40 IST2025-05-24T13:38:50+5:302025-05-24T13:40:11+5:30
Bullet Train News: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली केली आहे.

बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली केली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट तयार झाला आहे. त्याशिवाय गुजरातमधील सूरतजवळ ४० मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचं काम सुरू झालं आहे.
बुलेट ट्रेनच्या ३०० किमी मार्गावरील २५७ किमी मार्गाची निर्मिती ही फुल स्पॅन लाँचिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आलं आहे. त्यामुळे काम अधिक वेगानं झालं. या दरम्यान, अनेक लांब नदी पूल, स्टील आणि पीएससी ब्रिज आणि स्टेशन बिल्डिंगही बांधण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकल्पामधील ३८३ किलोमीटर पीयर्स, ४०१ किमी फाऊंडेशन आणि ३२६ किमी गर्डर कास्टिंगचं काम पूर्ण झालं आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण ३ स्टेशन तयार होत आहेत.
त्यातील सूरतमध्ये भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन जवळपास बांधून तयार झालं आहे. येथील उर्वरित काम वेगाने सुरू आहे. गुजरातमध्ये सुमारे १५७ किमी मार्ग जवळपास बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होऊ शकते. तसेच २०२९ पर्यंत बुलेट ट्रेन ही पूर्णपणे सेवेत येऊ शकते.
300 km viaduct completed.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 20, 2025
— Bullet Train Project pic.twitter.com/dPP25lU2Gy
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी खास डेपोही बांधले जात आहेत. सारं काही नियोजनानुसार पार पडलं तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला जपानमधील शिंकासेन ट्रेनचे डबे भारतात येऊ शकतात. तसेच ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत आणि बिलिमोरा स्थानकांदरम्यान, बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते.