Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:02 IST2025-01-31T16:01:41+5:302025-01-31T16:02:58+5:30
परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला
बेळगाव : मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांचे मृतदेह बेळगावात पोहोचले आहेत.
गुरुवारी सकाळी प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या चारही भाविकांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून प्रयागराजहून नवी दिल्लीला पाठविण्यात आले. दुपारी ३ वाजता बेळगाव दिल्ली विमानातून अरुण कोपर्डे आणि महादेवी भवनूर यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता बेळगाव विमानतळावर पोहोचले.
मेघा हत्तरवाड व ज्योती हत्तरवाड यांचे मृतदेह प्रयागराज होऊन दिल्लीला पोहोचण्यास थोडा विलंब झाल्याने त्या मायलेकींचे मृतदेह दिल्ली गोवामार्गे गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले.
परतताना एका भाविकाचा मृत्यू
कुंभमेळ्याहून बेळगावला परतणाऱ्या एका भाविकांचा रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवि जठार (वय ६१, बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, प्रयागराज येथून परत येत असताना पुण्यात रेल्वेतच मृत्यू झाला.