शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 05:29 IST

पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे नवीन डावपेच

श्रीनगर : व्हॉट्‌सॲपसारख्या मॅसेजिंग ॲपकडून खासगीत्वाबाबत होत असलेल्या चर्चेमध्येच पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना व त्यांचे म्होरके युवकांना भडकविण्यासाठी आता नव्या ॲपचा वापर करीत आहेत. यात तुर्की कंपनीने विकसित केलेल्या ॲपचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चकमकीनंतर मिळविलेले पुरावे, शरणागती पत्करणाऱ्या अतिरेक्यांनी पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटनांकडून कट्टरपंथी बनविण्याच्या प्रक्रियेची दिलेली माहिती, यावरून तीन नवीन ॲप प्रकाशात आले आहेत. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या ॲपची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील एक ॲप अमेरिकी कंपनीचे आहे, दुसरे युरोपच्या कंपनीचे तर तिसरे नवीन ॲप तुर्कीच्या कंपनीने विकसित केले आहे. अतिरेकी संघटनांचे म्होरके व काश्मीर खोऱ्यातील त्यांचे संभाव्य सदस्य सतत याचा वापर करीत आहेत.नवीन ॲप इंटरनेटची गती कमी असली तरी टूजी कनेक्शन असल्यावरही काम करते. विशेष म्हणजे सरकारने ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर येथील इंटरनेट सेवा स्थगित केली होती व सुमारे एक वर्षानंतर टूजी सेवा बहाल केली होती.सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंटरनेट खंडित झाल्यानंतर अतिरेकी गटांकडून व्हॉट्सॲप व फेसबुक मॅसेंजरचा वापर जवळपास बंदच झाला होता, परंतु नंतर कळाले की, ते नवीन ॲपचा वापर करीत आहेत व हे ॲप वर्ल्ड वाईड वेबवर मोफत उपलब्ध आहे.

आरएसए अमेरिकी नेटवर्क सुरक्षा व प्रमाणीकरण कंपनी असून, तिची स्थापना १९८२मध्ये केली होती. आरएसएचा संपूर्ण जगभरात वापर कूट प्रणालीच्या आधारावर होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,  ॲपमध्ये फोन नंबर किंवा ई-मेल पत्त्याची गरज नाही. त्यामुळे याच्या वापरकर्त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय राहते. 

नवीन ॲपच्या तंत्रज्ञानाची माहिती नवीन ॲपच्या तंत्रज्ञानाची माहिती २०१९मध्ये उघड झाली. तेव्हा अमेरिकेला पुलवामा हल्ल्यातील जैशच्या आत्मघाती हल्लेखोराकडून वापरल्या गेलेल्या व्हर्चुअल सीमच्या सेवा प्रदात्याची माहिती मागण्यात आली होती.  तथापि, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अन्य सुरक्षा संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, ४० व्हर्चुअल सीमचा वापर पुलवामा हल्ल्यासाठी करण्यात आला होता. याचबरोबर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी अशा ॲपचा वापर केला जात आहे, हेही उघड झाले. या तंत्रज्ञानात संगणक टेलिफोन नंबर जनरेट करतो. त्याच्या आधारावर यूजर आपल्या स्मार्टफोनमध्ये ॲप डाऊनलोड करू शकतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी