काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 4 दहशतवाद्यांचा खात्मा तर एका जवान शहीद

By Admin | Updated: September 11, 2016 12:39 IST2016-09-11T12:28:15+5:302016-09-11T12:39:35+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात यश आलं असून एक जवान

A terrorist attack in Kashmir, the killing of 4 terrorists and a young martyr | काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 4 दहशतवाद्यांचा खात्मा तर एका जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 4 दहशतवाद्यांचा खात्मा तर एका जवान शहीद

style="text-align: justify;">-ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.11- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात यश आलं असून एक जवान शहीद झाला आहे.
येथील नौगम सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याचा संशय आल्यानंतर लष्कराने गोळीबार केला. यावेळी दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. या चकमकीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 
तर, काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले असून एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 

Web Title: A terrorist attack in Kashmir, the killing of 4 terrorists and a young martyr