भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:11 IST2026-01-15T17:54:15+5:302026-01-15T18:11:54+5:30
हिंदी कॅप्शनसह प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सशस्त्र दलांनी सीमेपलीकडे असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी आणि अचूक हल्ले करताना दाखवले आहे. हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आले होते.

भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
भारतीय लष्कराने पाकिस्ताविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आज लष्कर दिनानिमित्त, भारतीय लष्कराने गेल्या वर्षी मे महिन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरशी संबंधित एक नवीन व्हिडीओ शेअर केला. त्यात पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे, हवाई तळ आणि रडार सिस्टीमवर केलेल्या अचूक हल्ल्यांचे दर्शन घडवले आहे. ही कारवाई मे २०२५ मध्ये करण्यात आली होती. जवळजवळ तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात भारतातील प्रमुख दहशतवादी हल्ल्यांची कहाणी सांगून होते, यात २००१ मध्ये संसदेवर हल्ला, २००२ मध्ये अक्षरधाम हल्ला, २००८ मध्ये मुंबईवर हल्ला, २०१६ मध्ये उरीवर हल्ला, २०१९ मध्ये पुलवामावर हल्ला आणि २०२५ मध्ये पहलगामवर दहशतवादी हल्ला यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
भारतीय सैन्याने या सर्व घटनांना "मानवतेवरील हल्ला" असे वर्णन केले आहे. हिंदी कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सशस्त्र दलांनी सीमेपलीकडे असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी आणि अचूक हल्ले केले. हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आले. हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. यामध्ये लष्कराने लिहिले की, "ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी अदम्य धैर्य, शौर्य आणि अटल दृढनिश्चयाने इतिहास रचला.
जयपूर येथील आर्मी डे परेडमध्ये दाखवण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये शौर्याची ही प्रेरणादायी गाथा पहा. भयंकर, अटल आणि असह्य... लष्कराने ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडीओ शेअर केला.
पाकिस्तानचा गोळीबार आणि भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानचे नाव न घेता व्हिडिओमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्युत्तरादाखल, भारतीय सैन्याने पाकिस्तानी ड्रोन पाडले, सीमेजवळील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले आणि नंतर पाकिस्तानी हवाई संरक्षण रडार आणि हवाई तळ नष्ट केले.
या व्हिडिओद्वारे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला एक कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओचा शेवट एका स्पष्ट विधानाने होतो, "आपल्या शत्रूंना इशारा. भ्याडपणाची किंमत मोजावी लागेल." हा व्हिडीओ केवळ लष्करी पराक्रमाचे प्रदर्शन करत नाही तर दहशतवादाच्या तोंडावर भारत आता शांत बसणार नाही असा स्पष्ट संदेश देखील देतो.