शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभ मेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक? कुंभात मौनी अमावास्येला ‘अमृतस्नाना’चा मुहूर्त साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:41 IST

Mahakumbh 2025: येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी  येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे.

महाकुंभ नगर -  येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी  येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था तसेच गर्दीचे व्यवस्थापन नेटकेपणाने करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

मौनी अमावास्या असलेला २९ जानेवारीचा दिवस हा कुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी निश्चित केलेला तिसरा दिवस आहे. अमृतस्नानासाठी ३ फेब्रुवारी (वसंत पंचमी), १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) हे दिवसही निश्चित करण्यात आले आहेत.या मेळ्यातील मौनी अमावास्या असलेला २९ जानेवारीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. (वृत्तसंस्था)

महाकुंभमेळ्यासाठी गुजरातचे विशेष पॅकेज- महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी गुजरात सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. त्यानुसार अहमदाबादमधील राणीप बस डेपोतून दर दिवशी सकाळी ७ वाजता एसी व्होल्व्हो बस प्रयागराजसाठी रवाना होईल, असे गुजरातचे परिवहनमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.- अहमदाबाद आणि प्रयागराज यांतील अंतर सुमारे १,२०० किमी आहे. त्यामुळे बस मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एका रात्रीसाठी थांबणार आहे. शिवपुरीतील मुक्कामदेखील पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. महाकुंभ मेळ्याला जाण्याचे हे पॅकेज ३ रात्री, ४ दिवसांचे असून, त्यासाठी प्रत्येकी ८,१०० रुपये इतके शुल्क आकारले जाईल.

२५१ किलोचे सोन्याचे सिंहासन चर्चेचा विषयमहाकुंभ मेळ्यात महामंडलेश्वर अरुण गिरी यांचे सिंहासन २५१ किलो सोन्यापासून बनविले आहे. ते आवाहन आखाडाचे पीठाधीश्वर आहेत. त्या सिंहासनावर सुबक नक्षीकाम केले आहे. ते पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. महाकुंभ परिसरातील सेक्टर-११मध्ये हे सिंहासन ठेवण्यात आले आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

गंगेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारच्या उपाययोजनागंगा नदीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. नदीच्या पाण्याच्या रोज चाचण्या करण्यात येतात.भाविकांनी आणलेली फुले, पूजा सामग्री वेगवेगळी केली जाते. कोणालाही निर्माल्य नदीत टाकण्यास परवानगी नाही. या मेळ्यात सांडपाणी तसेच मलमूत्राच्या निचऱ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश