शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एस.टी.बसने चिरडले टेम्पोला टेम्पो चालक ठार : वावडदा-वडली दरम्यान झाला अपघात, १६ जण जखमी

By admin | Updated: July 12, 2016 00:08 IST

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या एस.टी.बसने समोरुन येणार्‍या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा दोन्ही वाहनातील १६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता वावडदा-वडली या दरम्यान रसवंती जवळ झाला. अपघात इतका भयंकर होता, की, टेम्पो रस्त्यावरून थेट शेतात गेलेला आहे.

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या एस.टी.बसने समोरुन येणार्‍या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा दोन्ही वाहनातील १६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता वावडदा-वडली या दरम्यान रसवंती जवळ झाला. अपघात इतका भयंकर होता, की, टेम्पो रस्त्यावरून थेट शेतात गेलेला आहे.
पाचोरा येथील महावीर केटरर्सची जळगाव येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात ऑर्डर होती. त्या कामासाठी मालक प्रकाश सुगनचंद बाफना हे मजुरांना घेऊन टेम्पोने (क्र. एम.एच.२२-१३८१) जळगावात आले होते. संध्याकाळी पाच वाजता तेथील काम आटोपून पाचोरा येथे परत जात असताना वावडदा-वडलीच्या दरम्यान पाचोरा अगाराच्या पाचोरा-जळगाव (क्र.एम.एच.२० डी.एल.२२८५)या बसने टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यात टेम्पोचा चक्काचूर झाला.अपघातात ही बस टेम्पोला शेतात घेऊन गेली.
उपचारापूर्वीच चालकाचा मृत्यू
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सोनू या चालकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला. केटरर्सचे मालक प्रकाश बाफना (वय ५३ रा), अजय संजय रक्षे (वय १७), मंगेश नाना चंदनशिव (वय १९), विकान नाना चंदनशिव (वय २२), गणेश अभिमन्यू सौदागर (वय १९), मोसीन अब्दुल समद देशमुख (वय ४५) सर्व रा.पाचोरा व चॉँद खा (रा.कोल्हे, ता.पाचोरा) हे टेम्पोतील कामगार जखमी झाले आहेत. त्यातील गंभीर जखमी झालेल्यांनी जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. टेम्पोमध्ये बारा जण होते. मयत सोनु हा अविवाहित होता, असे त्याच्या सोबत असलेल्यांनी सांगितले. वडीलही चालक आहेत.
बसमधील जखमी प्रवाशी
रामकृष्ण विश्वनाथ जाधव (वय ४८ रा.विटनेर, ता.जळगाव), कैलास युवराज पाटील (वय २८ ), शालुबाई शिवदास पाटील (वय ४५), लिलाबाई भगवान पाटील (वय ६५), कमलबाई शामराव पाटील (वय ६०), जागृती अरुण पाटील (वय १०) सर्व रा.किनगाव ता.यावल व बसचा वाहक वाल्मिक जगन्नाथ अहिरे (वय ४० रा.भडगाव) आदी जखमी झाले आहेत. चालक मगराज दशरथ भागवत (रा.गिरड, ता.पाचोरा) हादेखील जखमी झाला आहे. तो घटनास्थळापासूनच गायब झाला होता.