शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 06:21 IST

एरवी भाव न मिळाल्याने रस्त्यांवर फेकून दिला जाणारा टोमॅटो सध्या दरवाढीमुळे चर्चेत आहे... पण ही स्थिती का आली?

पवन देशपांडे, आठवतंय ? दोन-तीन महिन्यांपूर्वी देशभरात ठिकठिकाणी लाल चिखल पाहायला मिळाला होता. टोमॅटोला अगदी एक-दोन रुपये भाव मिळू लागल्याने नाईलाजाने असंख्य शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेला माल डोळ्यांदेखत रस्त्यावर फेकावा लागला होता... आता याच टोमॅटोला पेट्रोलपेक्षाही जास्त भाव आलाय... शेतकऱ्यांसाठी हे सुखावह आहेच... ते असायलाच हवे... त्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळायलाच हवा.. यात कुठलीही शंका नाही. पण, कधी शेतकऱ्यांना रडकुंडीला आणणारे भाव तर कधी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाट देणारे दर... यात मध्यम मार्ग कधी निघत नाही का ? परवडेना म्हणून अनेक हॉटेल्सनी टोमॅटोचा वापरच बंद केला. काहींनी तर आपल्याकडील टोमॅटोच्या पदार्थांचे दर दुप्पटही केले. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनेही टोमॅटोच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. म्हणे आता टोमॅटोमुळे महागाई दर वाढू शकतो. (शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असतील, काय हरकत आहे ?) 

दोन महिन्यांत असे कोणते चित्र पालटले की, आधी १-२ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत असताना अचानक तो शंभरीच्या पुढे गेला ? टोमॅटोच्या भावात ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली ? दोन महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो रस्त्यावर फेकला त्यांच्या मनाची किती घालमेल सुरू असेल आणि आता त्यांच्या शेतात टोमॅटो नाही, म्हणून ते नशिबाला किती दोष देत बसले असतील? आणि निश्चितच आता टोमॅटोला भाव मिळतोय म्हणून ज्यांचा माल विकला जातो, त्यांच्यासाठी सुखावह आहेच. पण, दरातील हा एवढा चढउतार कशामुळे ? हा प्रश्न आहेच. 

गेल्या महिन्यात बिपोरजॉय वादळ आले. गुजरातमधून ते पोहोचले थेट राजस्थानात. या अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर प्रदेशातही तेच. महाराष्ट्र आणि कर्नाटकात किडीने हैराण केले. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले. साडेपाच लाख क्विंटल टोमॅटो बाजारात येत होता, तो अर्ध्यावर आलाय.  एकीकडे दोन महिन्यांआधी शेतकऱ्यांना रडू असे भाव तर दुसरीकडे दोन महिन्यांनी ग्राहकांच्या डोळ्यांत अश्रू येतील असे दर. हे टाळायचे कसे, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. सरकार यावर उपाय शोधू इच्छिते. अशी स्थिती कशी टाळावी, याच्या आयडिया मिळवण्यासाठी सरकारने चक्क स्पर्धाही भरवली आहे. टोमॅटो ग्रॅंड चॅलेंज आपण घेत असल्याचे आणि लोकांनी त्यावर आयडिया शेअर कराव्यात, असे आवाहनच ग्राहक व्यवहार  खात्याच्या सचिवांनी केले आहे. यातून समस्या मिटली तर उत्तमच पण, आणखीही प्रश्न आहेत, ते सोडवणेही गरजेचे आहे. 

कोल्ड स्टोरेजची संख्या वाढवणे आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध असणे ही गरज आहे. शीतगृहांमध्ये बटाट्यांचे प्रमाणच अधिक आहे. टोमॅटो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याची काळजी अधिक घ्यावी लागते, त्यांची विक्रीही कमी दिवसांत पूर्ण करावी लागते, ही समस्याही दरांच्या वाढत्या आणि घसरत्या किंमतींमध्ये आहे. टोमॅटोचे भरमसाठ उत्पादन झाले तर ते जास्तीत जास्त टिकवून ठेवता येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध झाल्यास, एकाच वेळी भरमसाठ माल बाजारात येणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच भाव वाढही भरमसाठ होणार नाही. मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण संतुलित राहील. पण, ही योग्य स्थिती सध्यातरी स्वप्नवत आहे. ती प्रत्यक्षात यावी, हीच इच्छा.

एवढ्यावर भागेल का? टोमॅटो स्वस्तात विकण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर तो टोमॅटो जिथे मागणी जास्त तिथे कमी दरात विकला जाईल. त्यातून किती स्वस्ताई येईल, टोमॅटो खरेदी करून सरकार किती दिवस ठेवू शकणार, किती काळ विकू शकणार असे प्रश्न आहेतच. 

एवढं सगळं घडण्याचं कारण काय ? एप्रिल-जून महिन्यात जे पीक बाजारात येते त्याची लागवड जानेवारी-मार्चमध्ये केली जाते. यंदा या काळात काही ठिकाणी प्रचंडउष्णता आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस होता. त्यामुळे टोमॅटोवर किडीचा हल्ला झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमी उत्पादन झाले. मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसानेही टोमॅटो पिकांचे नुकसान केले. त्यामुळे बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात यायला सुरुवात झाली. साहजिकच टोमॅटोचे भाव वाढले.

असे भाव कधीपर्यंत?गेल्या काही महिन्यांत टोमॅटोचे दर कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे पीक पुन्हा घेतलेच नाही. ज्यांनी घेतले त्यांना आता चांगला भाव मिळाला. आता वाढलेले भाव आणखी काही आठवडे राहू शकतात. या भावातील चढउतारावर सरकारने उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत टोमॅटो व्यावारी अजित बोरोडे यांनी व्यक्त केले.

(लेखक लोकमत मुंबईत आवृत्तीचे सहायक संपादक आहेत)

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या