टेलिग्राम रडारवर! ऑनलाइन सुरक्षा नियामक संस्थेने ठोठावला ५५ कोटींचा दंड, प्रकरण समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:37 IST2025-02-25T17:35:42+5:302025-02-25T17:37:43+5:30
Telegram abuse content case: लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामला उशिराने उत्तर देण्याची चूक चांगलीच भोवली आहे. हे प्रकरण काय आहे, ते समजून घ्या...

टेलिग्राम रडारवर! ऑनलाइन सुरक्षा नियामक संस्थेने ठोठावला ५५ कोटींचा दंड, प्रकरण समजून घ्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामला उत्तर देण्यास विलंब करण्याच्या एका चुकीमुळे तब्बल ५५ कोटी रुपयांचा दणका सोसावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऑनलाइन सुरक्षा नियामक संस्थेने सोमवारी (२३ फेब्रुवारी) मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामला जवळपास १० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ५५.४७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड टेलिग्रामने मुलांच्या शोषणासह हिंसक अतिरेकी सामग्रीच्या (व्हिडीओ आणि फोटो) प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करण्यास झालेल्या विलंबामुळे लावला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोप होता की, लाईव्ह स्ट्रीमिंग फीचर्स, अल्गोरिदम आणि रिकमेंडेशन सिस्टममार्फत अतिरेकी गट नवे युजर्सची भरती करत आहेत. यास कंपन्या प्रतिबंध करीत नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या ईसेफ्टी कमिशनने मार्च २०२४ मध्ये यूट्यूब, एक्स, फेसबुक, टेलीग्राम आणि रेडिटकडून स्पष्टीकरण मागितले होते. टेलीग्राम व रेडिटला मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री रोखण्यासाठी कोणती पावले उचलली, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते.
यासाठी मे २०२४ पर्यंत वेळ दिला असताना टेलीग्रामने उत्तर ऑक्टोबरमध्ये दिले. या विलंबामुळे दंड ठोठावला. ऑस्ट्रेलियाच्या ईसेफ्टी कमिशनर जूली इनमॅन ग्रँट म्हणाले की, सर्व कंपन्यांनी कायद्यांकडून पालन आवश्यक आहे. टेलीग्रामच्या विलंबामुळे सुरक्षा उपाय अमलबजावणीत अडथळे आले.
कंपनीचे म्हणणे काय?
टेलिग्रामने म्हटले आहे की, "आम्ही गेल्या वर्षी ईसेफ्टीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती आणि कोणतेही प्रलंबित मुद्दे राहिलेले नव्हते. हा दंड अन्यायकारक. केवळ उत्तर देण्यास उशीर झाल्याने लावला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात अपील करू.