मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:15 IST2025-11-20T15:05:51+5:302025-11-20T15:15:33+5:30
आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यावर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज गुरुवारी १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची पदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासह आज पटनाच्या गांधी मैदानावर एकूण २६ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
नितीश कुमार यांच्या शपथविधीनंतर राजद नेते तेजस्वी यादव यांनी मोठे विधान केले आहे. तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नितीश कुमार आणि इतर मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
सोशल मीडिया पोस्टमध्ये तेजस्वी यादव यांनी लिहिले की, "बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल आदरणीय नितीश कुमारजींचे हार्दिक अभिनंदन. मंत्रिमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेतलेल्या बिहार सरकारच्या सर्व मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन."
नवीन सरकार लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करून आपली आश्वासने आणि घोषणा पूर्ण करेल आणि बिहारच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडवून आणेल अशी आशा आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
आदरणीय श्री नीतीश कुमार जी को बिहार के मुख्यमंत्री पद की शपथ लेने पर हार्दिक बधाई। मंत्रिपरिषद् के सदस्य के रूप में शपथ लेने वाले बिहार सरकार के सभी मंत्रियों को हार्दिक शुभकामनाएँ।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 20, 2025
आशा है नई सरकार जिम्मेदारीपूर्ण लोगों की आशाओं और अपेक्षाओं पर खरा उतर अपने वादों एवं घोषणाओं को…