शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:11 IST

Tej Pratap Yadav News: बिहारमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्रा तेजप्रताप यादव यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांनी पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

बिहारमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्रा तेजप्रताप यादव यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांनी पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तेजप्रताप यादव यांची वर्तणूक वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक मूल्यांची अवहेलना करणारी असल्याचे सांगत लालूप्रसाद यादव यांनी यापुढे पक्ष आणि कुटुंबामध्ये त्यांना कुठलेही स्थान असणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

आपल्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या तेजप्रताप यादव यांनी काल सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे फोटो शेअर करून तिच्यासोबतच्या नात्याबाबत माहिती दिली होती. मात्र नंतर ही पोस्ट डिलिट करताना आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यावरून चर्चांना उधाण आले होते. तसेच यावरून तेजप्रताप यादव आणि आरजेडीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज लालू प्रसाद यादव यांनी ही कारवाई केली आहे.

तेजप्रताप यादव यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लालूप्रसाद यादव म्हणाले की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांचा अवमान करणे आमच्या सामाजिक न्याय आणि सामूहिक संघर्षाला कमकुवत करते. माझ्या ज्येष्ठ पुत्राची वागणूक, लोकाचरण आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्कार यांना शोभणारं नाही आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीमुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे.  आता पक्ष आणि कुटुंबामध्ये त्याचं कुठलंही स्थान असणार नाही. तेजप्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.

लालूप्रसाद यादव यांनी पुढे लिहिले की, आपल्या वैयक्तिक जीवनातील बरं-वाईट, गुणदोष पाहण्यासाठी तो स्वत: सक्षम आहे. आता जे लोक त्याच्यासोबत संबंध ठेवतील. त्यांनी स्वत:च्या बुद्धीने तसा निर्णय घ्यावा. मी सार्वजनिक जीवनामध्ये मर्यांदाचा नेहमी पुरस्कार केला आहे. माझ्या कुटुंबातील आज्ञाधारी व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात याच विचाराचं आचरण केलं आहे, असेही लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल