तंत्रज्ञानातून वाढेल एकरी उत्पन्न: मंचरला शेतकरी मेळावा

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:11+5:302015-08-18T21:37:11+5:30

मंचर : पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सा‘ाने शेतीमध्ये नवीन प्रयोग शेतकर्‍यांनी केले पाहिजेत. त्याद्वारे विविध पिके घेतल्यास एकरी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे - विजयराव पाटील यांनी केले.

Techniques to grow from acreage: farmer rally in Manchera | तंत्रज्ञानातून वाढेल एकरी उत्पन्न: मंचरला शेतकरी मेळावा

तंत्रज्ञानातून वाढेल एकरी उत्पन्न: मंचरला शेतकरी मेळावा

चर : पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सा‘ाने शेतीमध्ये नवीन प्रयोग शेतकर्‍यांनी केले पाहिजेत. त्याद्वारे विविध पिके घेतल्यास एकरी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे - विजयराव पाटील यांनी केले.
मंचर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष अरुण महादेव लोंढे होते. याप्रसंगी सरपंच अश्विनी शेटे, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, माजी सरपंच प्रल्हाद बाणखेले, सीताराम लोंढे, शिरीज सुरंजे, ललीत शेळके आदी उपस्थित होते.
विजयराव पाटील यांनी शेतकर्‍यांनी शेती करताना आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक तर सतीष टाव्हरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Techniques to grow from acreage: farmer rally in Manchera