शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो, सोशल मीडियावर पोस्ट पडेल महागात, सीबीएसईचा इशारा; १०वी, १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांसाठी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:39 IST

 सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, काही परीक्षक सोशल मीडियावर मूल्यमापन प्रक्रियेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांसाठी कडक नियमावली जारी केली आहे. मूल्यमापन प्रक्रियेतील कोणतीही गोपनीय माहिती, अनुभव किंवा मते सोशल मीडियावर शेअर केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर आणि शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्डाने सोमवारी दिला आहे.

 सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, काही परीक्षक सोशल मीडियावर मूल्यमापन प्रक्रियेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. 

अफवा पसरू शकतात शिक्षकांच्या पोस्टमुळे विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची शक्यता असते. सीबीएसईची उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया ही अत्यंत गोपनीय असून ती कठोर नियमांच्या अधीन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबद्दल भाष्य करणे हे व्यावसायिक आचरणाचे उल्लंघन मानले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अफवा पसरवण्याचे २० प्रकार उघडसध्या सुरू असलेल्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या काळात चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचे किमान २० प्रकार समोर आले असून, याप्रकरणी कडक पावले उचलण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

अफवा पसरवणारे व्हिडिओ संबंधित सोशल मीडियावरून तातडीने हटवण्यात आले आहेत. बनावट बातम्या रोखण्यासाठी सीबीएसई बोर्ड 'सर्ट-इन' आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्रासोबत सातत्याने संपर्कात असून सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CBSE Warns Teachers: Social Media Posts Could Prove Costly!

Web Summary : CBSE warns examiners against sharing confidential evaluation details on social media. Violators face legal and disciplinary action. False information spreads, creating confusion. The board is monitoring social media to curb rumors during exams and has removed misleading content. Twenty instances of misinformation have been identified.
टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी