शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

एअर होस्टेसवर टॅक्सीचालकाचा बलात्काराचा प्रयत्न

By admin | Updated: August 31, 2016 11:32 IST

औषधे आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय एअर होस्टेसवर एका टॅक्सीचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि.३१ - औषधे आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय एअर होस्टेसवर एका टॅक्सीचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हैदराबादमध्ये ही घटना घडली. आरोपीने एअर होस्टेसचा विनयभंग करुन तिच्या जवळची रोख रक्कम लुटली. त्यानंतर पीडित तरुणीला निर्जनस्थळी सोडून तिथून पसार झाला. 
 
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचे नाव इमरान आहे. पोलिसांनी इमरानवर बलात्कार आणि दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी मध्यरात्री पीडित तरुणी औषधे आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. जवळचे औषधाचे दुकान बंद असल्याने ती जवळ उभ्या असलेल्या टॅक्सीकडे गेली. 
 
औषधाच्या दुकानात जाण्यासाठी म्हणून ती टॅक्सीत बसली. पण टॅक्सीचालक तिला आउटर रिंग रोडवर निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असे पीडित तरुणीने राजेंद्रनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे. 
 
पीडित तरुणी ड्रायव्हरच्या शेजारी बसली होती. त्याने हाताला पकडून जवळ खेचण्याचा प्रयत्न केला पण  तरुणीने त्याला जोरदार प्रतिकार केला. त्या झटापटीत ड्रायव्हरने माझ्या हातातून मोबाईल खेचून घेतला व मला  निर्जन स्थळी उतरवले पसार झाला असे तरुणीने सांगितले.