शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामासाठी टॅक्सीचालकांना ४८ तासांची सक्ती

By admin | Updated: September 23, 2014 02:56 IST

निवडणूक कामासाठी टॅक्सींना मोठ्या प्रमाणात मागणी असून, यंदाही विधानसभा निवडणुकीत टॅक्सींचा वापर केला जाणार आहे.

मुंबई : निवडणूक कामासाठी टॅक्सींना मोठ्या प्रमाणात मागणी असून, यंदाही विधानसभा निवडणुकीत टॅक्सींचा वापर केला जाणार आहे. यासाठी टॅक्सीचालकाला भाडे दिले जाणार आहे. मात्र हे भाडे देताना ४८ तासांच्या ड्युटीची अट त्यांना घालण्यात आली आहे. ४८ तासांची ड्युटी पूर्ण न केल्यास मग २४ तासांचेच भाडे टॅक्सीचालकांना मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी खासगी वाहनांचा व टॅक्सीही वापरण्यात येतात. २00९च्या निवडणुकीत पाच टॅक्सी संघटनांना या कामासाठी होत्या. कुलाबा ते मुलुंडपर्यंत प्रत्येक विभागातील निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकूण २ हजार २00 टॅक्सी उपलब्ध केल्या होत्या; तसेच पोलिसांसाठी ६0 टॅक्सी होत्या. त्या वेळी २४ तासांसाठी १,२00 रुपये भाडे ठरवण्यात आले होते. त्यानंतर २0१४च्या लोकसभा निवडणुकीत १,५00पेक्षा जास्त टॅक्सींची मागणी आरटीओकडून करण्यात आली. २४ तासांसाठी १,८३0 रुपये आणि १00 किलोमीटरनंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १२ रुपये टॅक्सीचालकांना त्या वेळी देण्यात आले. मात्र या वेळी २000 रुपये भाडे देण्यात यावे, अशी मागणी टॅक्सीचालकांकडून आरटीओकडे करण्यात आली होती. या मागणीला आरटीओने नुकत्याच झालेल्या बैठकीत धुडकावले असून, १,८५0 रुपये देणे मान्य केले आहे. (प्रतिनिधी)