तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:36 IST2025-11-17T12:36:01+5:302025-11-17T12:36:51+5:30
Tamilnadu : मुख्यमंत्र्यांसह नामांकित अभिनेत्यांच्या घरांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी...
Tamilnadu : तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी(दि.16) रात्री मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमार, अरविंद स्वामी आणि अभिनेत्री खुशबू यांच्या निवासस्थाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकी देणारा ईमेल पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चारही ठिकाणी सुरक्षा तपासणी सुरू केली.
अजित कुमार यांना दुसऱ्यांदा धमकी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे पहिल्यांदाच घडले नाही. गत आठवड्यातही अभिनेते अजित कुमार आणि अरुण विजय यांच्या चेन्नईतील घराला अशाच प्रकारची बॉम्ब धमकी मिळाली होती. आता आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्री निवासस्थान आणि तीनही अभिनेत्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
या सर्व ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडने कसून तपासणी केली असून, सुदैवाने कुठेही स्फोटक सामग्री आढळली नाही. तसेच, अद्याप पोलिसांनी धमकी पाठवणारी व्यक्ती किंवा तिचा हेतू उघड केलेला नाही. ईमेलचा सोर्स, IP अॅड्रेस आणि तांत्रिक तपशील तपासून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.