तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:05 IST2026-01-21T13:04:12+5:302026-01-21T13:05:04+5:30

Tamilnadu Assembly Election 2026: आगामी मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

Tamilnadu Assembly Election 2026: BJP's strength will increase in Tamil Nadu; AMMK party will join NDA | तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील...

तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील...

Tamilnadu Assembly Election 2026: यावर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वातील अम्मा मक्कल मुनेत्र कळगम (AMMK) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी झाला आहे. यासह भाजपची राज्यातील ताकद वाढेलच, शिवाय तामिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिनाकरन-पीयूष गोयल भेट; मोठ्या फेरबदलांचे संकेत

भारतीय जनता पक्ष अनेक वर्षांपासून तामिळनाडूत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अद्याप पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. आता यावर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच दिशेने टीटीव्ही दिनाकरन आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते पीयूष गोयल यांची भेट झाली. या भेटीत दिनाकरन यांनी एनडीएत सामील होण्याची घोषणा केली.

2026 निवडणूक: सत्ताधाऱ्यांची कसोटी

तामिळनाडू विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 10 मे 2026 रोजी संपणार आहे. सत्ताधारी डीएमकेसाठी ही मोठी कसोटी ठरणार असून, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कडवी लढत द्यावी लागणार आहे. त्यांच्यापुढे यंदा फक्त भाजप आणि एआयएडीएमकेच नाही, तर अभिनेता अभिनेता थलपती विजय ‘तमिळगा वेट्ट्री कळगम’ पक्षाचेही आव्हान असणार आहे. 

2021 निवडणूक निकाल

2021 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने 234 पैकी 133 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसने डीएमकेच्या युतीतून 18 जागा जिंकल्या होत्या. सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या एआयएडीएमकेला त्या वेळी केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला एआयएडीएमकेसोबत युतीतून चार जागा मिळाल्या होत्या.

Web Title : तमिलनाडु में भाजपा को मिलेगी ताकत; एएमएमके एनडीए में हो सकता है शामिल

Web Summary : 2026 के तमिलनाडु चुनावों से पहले, एएमएमके के टीटीवी दिनाकरन एनडीए में शामिल हो सकते हैं, जिससे भाजपा की संभावनाओं को बढ़ावा मिलेगा। इससे तमिलनाडु के राजनीतिक समीकरणों में महत्वपूर्ण बदलाव हो सकता है क्योंकि भाजपा संभावित गठबंधनों के साथ राज्य में अपनी उपस्थिति बढ़ाने का लक्ष्य बना रही है।

Web Title : BJP to Gain Strength in Tamil Nadu; AMMK Likely to Join NDA

Web Summary : Ahead of the 2026 Tamil Nadu elections, AMMK's TTV Dhinakaran may join the NDA, boosting BJP's prospects. This could significantly alter Tamil Nadu's political dynamics as BJP aims to increase its presence in the state with potential alliances and challenge DMK.