शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

भावासोबत नाचली म्हणून मुलाने मारली चापट, नवरीने त्याच दिवशी दुसऱ्या मुलासोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 7:07 PM

तामिळनाडूमध्ये एका लग्नात किरकोळ कारणावरुन सुरू झालेले भांडण इतके वाढले की, लग्नाच्या दिवशीच नवरीने लग्न मोडले.

कुड्डालोर:लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन असतं. हा जीवनातील सर्वोत्तम क्षण आहे. लोक आनंदाने-उत्साहाने एकमेकांचा स्विकार करतात. 7 जन्म एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. मात्र, तामिळनाडूत सात फेऱ्यांआधीच नवरीने मुलाच्या कृत्यावर नाराज होऊन लग्न मोडून त्याच दिवशी दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याची अजब घटना घडली आहे.

मुलाने नवरीच्या मारली गालातमिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये एका लग्नात किरकोळ कारणावरुन सुरू झालेले भांडण इतके वाढले की, लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीने लग्न मोडले. झाले असे की, लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत सेरेमनी सुरू होती. यावेळी नवरीचा चुलत भाऊ नवरी आणि नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता. यामुळे संतापलेल्या नवऱ्या मुलाने सगळ्यांसमोर नवरीच्या गालावर जोरदार चापट मारली. यानंतर नाराज मुलीने त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.

त्याच दिवशी दुसऱ्या मुलाशी केले लग्नटाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पाणरुती भागातील आहे. लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती. पण, एका शुल्लक कारणावरुन आनंदाचे वातावरण असलेल्या घरात शांतता पसरली. नवऱ्या मुलाने नवरीच्या गालात मारल्यानंतर वाद वाढला आणि मुलीने लग्नास नकार दिला. 

मुलाने पोलिसांत दाखल केली तक्रारविशेष म्हणजे, त्याच दिवशी नवऱ्या मुलीने लग्नात उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका मुलासोबत लग्न केले. एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना 20 जानेवारी रोजी घडली. ही अजब घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि यावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, लग्न मोडल्यानंतर संतापलेल्या नवऱ्या मुलाने पोलीस ठाण्यात वधूसह तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, लग्नात झालेला खर्च देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूmarriageलग्न