द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 06:13 IST2026-04-15T06:12:44+5:302026-04-15T06:13:06+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Tamil Nadu Assembly Election 2026: People are fed up with DMK's dynastic rule: J.P. Nadda's statement | द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान

द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान

चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू ही 'गुन्हेगारीची राजधानी' बनली असून जनता आता घराणेशाहीपासून मुक्ती इच्छित आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा २,००० रुपयांची मदत, वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर आणि ई-स्कूटर खरेदीसाठी २५,००० रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. 

राज्याला गांजामुक्त करणार
राज्याला 'गांजा-मुक्त' करण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे सांगत भाजपने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी 'उझावे थाई' योजनेतून वार्षिक ९,००० रुपयांची मदत आणि बेरोजगार तरुणांच्या शैक्षणिक कर्जाची माफी यांसारख्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. 

Web Title : द्रमुक की वंशवाद से जनता परेशान: जे.पी. नड्डा का बयान

Web Summary : जेपी नड्डा ने द्रमुक की आलोचना करते हुए तमिलनाडु को स्टालिन के तहत 'अपराध राजधानी' बताया। बीजेपी के घोषणापत्र में महिलाओं को ₹2,000 मासिक, मुफ्त गैस सिलेंडर और ई-स्कूटर सब्सिडी का वादा किया गया है। उन्होंने गांजा मुक्त राज्य और मादक पदार्थों की तस्करी के लिए मृत्युदंड का वादा किया।

Web Title : People tired of DMK dynasty: JP Nadda's statement

Web Summary : JP Nadda criticized DMK, calling Tamil Nadu a 'crime capital' under Stalin. BJP's manifesto promises ₹2,000 monthly for women, free gas cylinders, and e-scooter subsidies. They pledge a 'ganja-free' state with strict penalties, including the death penalty for drug trafficking, plus farmer aid and student loan waivers.