शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू- भाग २

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

-आयसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याच

-आयसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याच
स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णाना घेऊन आयसोलेशन वॉर्डात स्वाईन फ्लू कक्ष सुरू करणे अपेक्षित होते. परंतु दीड महिना उलटूनही या संदर्भात काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या स्थितीत आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण भरती नाही. रुग्णालयातील तब्बल २० खाटा रिकाम्या पडल्या आहेत.

-तीन रुग्णालय, रुग्ण मात्र शून्य
महानगरपिालकेच्या तीन मोठ्या रुग्णालयात रुग्णांना भरती करून घेण्याची सोय आहे. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय आणि सदर येथील रोग निदान केंद्र. या रुग्णालयांच्या देखभालीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कोट्यावधी रुपये खर्च होतात. परंतु रुग्णाला याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. अख्खे शहर स्वाईन फ्लूच्या दहशतीत असताना एकही रुग्ण या इस्पितळात भरती करून घेतला जात नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे सांगून मनपाचे अधिकारी वेळ मारून नेतात.

- ३८ डॉक्टरांचा ताफा
पण उपचार नाहीत
मनपाच्या आरोग्य विभागाकडे ३८ एमबीबीएस डॉक्टर आहेत. यातील २८ डॉक्टर नियमित असून १० डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर आहे. यांच्या मदतीने स्वाईन फ्लू रुग्णांना भरती करून उपचार करणे शक्य आहे. गरज पडल्यास मेयो, मेडिकलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांची चमू मागविणे शक्य आहे. परंतु कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.

-जनजागृती नावापुरतीच
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्याकरिता जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावली आहेत. परंतु शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता विशेषत: दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याने ही जनजागृती नावापुरतीच असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. जनजागृती सोबत आवश्यक वैद्यकीय सुविधा महापालिकेेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.