'हॅप्पी संडे', युजरच्या ट्विटला सुषमा स्वराज यांचं मजेशीर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 13:04 IST2018-05-21T13:04:12+5:302018-05-21T13:04:12+5:30
सोशल मीडियावर अनेकदा सुषमा स्वराज यांचं कौतुक होताना पाहायला मिळतं.

'हॅप्पी संडे', युजरच्या ट्विटला सुषमा स्वराज यांचं मजेशीर उत्तर
नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटवर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. लोकांच्या प्रश्नांनां उत्तर देताना आपण त्यांना नेहमीच पाहतो. तसंच मदतीसाठीही सुषमा स्वराज लगेच उत्तर देतात. पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचारासाठी वैद्यकिय व्हिसा देण्यासाठीचे सुषमा स्वराज यांचे ट्विट आपण नेहमी पाहतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा सुषमा स्वराज यांचं कौतुक होताना पाहायला मिळतं. काही वेळी सुषमा स्वराज यांची विनोद बुद्धीही युजर्सला विचार करायला लावते.
Geeta - There is no Sunday for me dear. It's a happy working day. https://t.co/3NGU1vPbM4
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 20, 2018
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं एक असंच ट्विट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. गीता शर्मा नावाच्या एका युजरने 20 मे रोजी सकाळी साडेपाच वाजता सुषमा स्वराज यांनी हॅप्पी संडे असं ट्विट केलं. त्यावर सुषमा स्वराज यांनी अगदी मजेशीर उत्तर दिलं.'माझ्यासाठी कुठलाही रविवार नसतो. हा हॅप्पी वर्किंग डे आहे',असं उत्तर सुषमा स्वराज यांनी दिलं. सुषमा स्वराज यांच्या या ट्विटला युजर्सनेही चांगला प्रतिसाद दिला आहे. कामाबद्दलच्या सुषमा स्वराज यांच्या एकनिष्ठतेचं कौतुक केलं जातं आहे.
सुषमा स्वराज तुम्ही सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहात, असं एका युजरने म्हटलं. तुमच्यामुळे अनेक तरूणांना प्रेरणा मिळते आहे, असंही ट्विटर युजर्सनी म्हणत सुषमा स्वराज यांचं कौतुक केलं.