शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सुशांत सिंह प्रकरण : CBIची SIT येणार मुंबईत, रिक्रिएट करणार क्राईम सीन; रियाची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 17:26 IST

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, ''पाटणा एथे दाखल करण्यात आलेली एफआयआर अगदी बरोबर आहे आणि आम्ही आमच्या विशेष शक्तीअंतर्गत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत आहोत. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयच अरेल.''

ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने पूर्वीच एसआयटीची स्थापना केली होती.आता, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सीबीआयची नजर आहे.मुंबईत आल्यानतंर हा चमू क्राईम सीन रिक्रिएट करेल.

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने पूर्वीच एसआयटीची स्थापना केली होती. आता, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सीबीआयची नजर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, आता मुंबई पोलीस काही कायदेशीर पाऊल उचलते का, याची सीबीआय वाट पाहत आहे. यानंतर, सीबीआयने स्थापन केलेल्या एसआयटीचा चमू मुंबईला येणार आहे. मुंबईत आल्यानतंर हा चमू क्राईम सीन रिक्रिएट करेल आणि रिया चक्रवर्ती तसेच तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करेल. यावेळी एसआयटीसोबतच फॉरेंसिकचा चमूही असेल.

सुशांत सिंह केससंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही महत्वाच्या गोष्टी -सुशांत सिंह प्रकरणावर दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याच्या मृत्यूचे सत्य  सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, तेव्हा मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल केला होती. शवविच्छेदनानंतर मुंबई पोलिसांनी हा गंभीर गुन्हा न मानता, याप्रकरणी एफआयआर दाखल केली नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, ''पाटणा एथे दाखल करण्यात आलेली एफआयआर अगदी बरोबर आहे आणि आम्ही आमच्या विशेष शक्तीअंतर्गत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत आहोत. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयच अरेल.''

14 जूनला फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला होता सुशांत सिंह -सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते. सुशांत सिंहच्या वडिलांनी पाटणा येथे एफआयआर दाखल केली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि धोका देण्यासंदर्भात आरोप करण्यात आले आहेत. या एफआयआरलाच रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर -यासंदर्भात, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, "सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास कुठे तरी कमी पडत होता. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा. सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपास सीबीआयकडे सोपवा. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होते, त्याचे कारण सरकारला माहिती आहे, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस