देशातील अनेक भागात सध्या मेट्रो रेल्वेची कामे वेगाने सुरू आहेत. यादरम्यान, काही अपघातही घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळून दुर्घटना झाली होती. आता गुजरातमधील सूरत येथे मेट्रोच्या बांधामादरम्यान अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या गंभीर हलगर्जीमुळे मेट्रोसाठी खोदलेल्या २० फूट खोल खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडला. या घटनेत दुचाकीस्वार तरुणासह दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुण आणि महिलेला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे.
या दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जिथे मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते. त्यामुळे दुचाकीस्वाराला रस्त्यात असलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण आणि मागे बसलेली महि असे दोघेही २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडले. खड्ड्यातून बाहेर पडल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातातबाबत अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. तसेच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहिल्यानंतर अधिकारी घटनास्थळावरून पळ काढताना दिसले. तसेच घटनेबाबत काही उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान, या अपघातानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बांधाकाम करत असलेल्या कंपनीने रात्री हा खड्डा योग्य रीतीने सुरक्षित केला नव्हता, तसेच तिथे इशारा देणारी लाईटही लावली नव्हती, त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Web Summary : Surat: Negligence at a metro construction site caused a two-wheeler accident. A youth and woman fell into a 20-foot pit, sustaining injuries. Locals allege inadequate safety measures and demand an investigation as officials avoid comment.
Web Summary : सूरत में मेट्रो निर्माण स्थल पर लापरवाही के कारण हादसा हुआ। एक युवक और महिला 20 फीट गहरे गड्ढे में गिर गए, जिससे वे घायल हो गए। स्थानीय लोगों ने सुरक्षा उपायों की कमी का आरोप लगाया और जांच की मांग की है, जबकि अधिकारी टिप्पणी करने से बच रहे हैं।