Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected | SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली 

SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली 

ठळक मुद्देही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणील सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected 

अखेर ठाकरे सरकारने परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका


या प्रकरणात महाराष्ट्रातील उच्च अधिकारी गुंतलेले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. अनिल देशमुख यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणाले की, कायदा प्रत्येकासाठी समान असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, असे असू शकत नाही की, पोलीस आयुक्तांनी काही बोलल्यामुळे त्यांचे बोलणे पुरावे बनतील. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून याप्रकरणी सीबीआय चौकशी होणं उचित असल्याचं सर्वोच्च न्यायालय म्हणालं आहे. आज अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांच्या आव्हान याचिकेवर न्या. संजय कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर लक्ष दिलं असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच दीड तास याप्रकरणी दिग्गज वकिलांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी ऍड जयश्री पाटील यांच्या बाजूने युक्तिवाद केला. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते, या आरोपावरून काल गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याचिकेवर उच्च न्यायालयाने देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ठाकरे सरकारने ६ एप्रिल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आव्हान याचिका दाखल केली. राज्य सरकारपाठोपाठ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांच्या याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ५ एप्रिलला दिलेल्या आदेशाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर लगबगीने अनिल देशमुख हे दिल्लीला पोहोचले. अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली होती. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.