शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मारन यांना हायकोर्टात पाठवण्याचा आदेश मागे सुप्रीम कोर्ट : अवघ्या काही तासांतच फिरवला निर्णय

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

नवी दिल्ली : एअरसेल- मॅक्सीस सौद्याबाबत द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने अवघ्या काही तासांतच तो फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

नवी दिल्ली : एअरसेल- मॅक्सीस सौद्याबाबत द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने अवघ्या काही तासांतच तो फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
२ जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी सवार्ेच्च न्यायालयांतच करण्याची व्यवस्था याच न्यायालयाच्या एका आदेशानुसार करण्यात आली असल्याकडे सीबीआयने लक्ष वेधल्यानंतर न्या. व्ही. गोपाल गौडा आणि न्या. आर. भानुमती यांनी आदेश फिरविला. २ जी स्पेक्ट्रमच्या सर्व प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाकडे होत आहे. या सर्व प्रकरणांची सुनावणी केवळ एकाच ठिकाणी होईल. देशात अन्य कोणत्याही न्यायालयात होणार नाही, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे, ही बाब अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी सीबीआयची बाजू मांडताना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भोजन अवकाशाला काही वेळ उरला असताना खंडपीठाने आपला आदेश बदलला. आनंद यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने आपला आदेश मागे घेत हे प्रकरण ९ फेब्रुवारी रोजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचा नवा आदेश दिला.
-------------------------
हस्तक्षेपाला नकार
तत्पूर्वी व्ही. गोपालगौडा यांच्या खंडपीठाने या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार देत दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा आदेश मारन बंधूंना दिला होता. घटनेच्या कलम २२६ नुसार उपाय शोधल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या. हा मूलभूत अधिकाराचा मुद्दा आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही काही आदेश दिला तर प्रत्येक जण मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा मांडण्यासाठी आमच्याकडे येईल. आधीच आरोपपत्र दाखल झाले असताना आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तुमच्यावर आरोप नसतील तर तुम्ही दोषमुक्त करण्याची मागणी कराल, असेही खंडपीठाने म्हटले होते.
------------------
आरोप फेटाळला
दयानिधी मारन हे दूरसंचारमंत्री असताना २ जी स्पेक्ट्रमच्या एकाही परवान्याचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण त्याच्याशी संबंधित नाही, असे सांगत मारनबंधूंचे वकील सी.ए. सुंदरम यांनी आरोप फेटाळून लावला. गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी २ जी विशेष न्यायालयाने एअरसेल- मॅक्सिस सौद्याबाबत मारन बंधू आणि मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन यांच्यासह सहा जणांना समन्स पाठवून २ मार्च २०१५ पूर्वी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला होता.