शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोन शब्द वगळून सुप्रीम कोर्टाने बदलला कायदा!

By admin | Updated: October 13, 2016 06:25 IST

घरातीलच व्यक्तींकडून होणाऱ्या छळापासून महिलांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने १० वर्षांपूर्वी केलेल्या ‘प्रोटेक्शन आॅफ विमेन फ्रॉम डोमॅस्टिक व्हायलन्स अ‍ॅक्ट’

अजित गोगटे / मुंबईघरातीलच व्यक्तींकडून होणाऱ्या छळापासून महिलांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने १० वर्षांपूर्वी केलेल्या ‘प्रोटेक्शन आॅफ विमेन फ्रॉम डोमॅस्टिक व्हायलन्स अ‍ॅक्ट’ या कायद्यातून ‘प्रौढ पुरुष’ हे दोन शब्द काढून टाकून सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यात आमुलाग्र बदल केल्याने आता छळ करणाऱ्या घरातील पुरुषांसोबत महिलांवरही या कायद्याचा बडगा उगारणे शक्य होइल.या कायद्याच्या कलम २ मध्ये कायद्यात वापरलेल्या विविध शब्द/ शब्दावलींच्या व्याख्या दिल्या आहेत. त्यापैकी पोटकलम २(क्यू)मध्ये ‘प्रतिवादी’ची म्हणजे या कायद्यानुसार ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येईल अशा व्यक्तींची व्याख्या आहे. त्यात तक्रारदार महिलेने ज्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे, अशी घरातील कोणीही प्रौढ पुरुष व्यक्ती, असे म्हटले होते. न्यायालयाने यातून ‘प्रौढ पुरुष’ हे दोन शब्द काढून टाकल्याने प्रतिवादीची व्याख्या घरातील फक्त प्रौढ पुरुषांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता तक्रारदार महिलेचा छळ करणारी घरातील व्यक्ती पुरुष असो वा स्त्री, या दोघांविरुद्धही न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना म्हटले की, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास समानतेचा आणि कायद्याकडून समान वागणूक मिळण्याचा हक्क बहाल केला आहे. त्यामुळे छळ होणाऱ्या महिलेला घरातील फक्त प्रौढ पुरुषांविरुद्धच दाद मागता येईल, ही या कायद्यातील तरतूद राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाच्या विपरित आहे.न्यायालय म्हणते की, घरात छळ होणाऱ्या महिलांना हर तऱ्हेचे संरक्षण देण्याच्या उद्देशना कायदेमंडळाने हा कायदा केला आहे. कायद्यास अपेक्षित असलेला छळ लिंगसापेक्ष नाही. तसेच शारीरिक, लैंगिक, मौखिक, भावनिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या छळास हा कायदा लागू होतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहिल्यास असे दिसते की, घरांमध्ये महिलेचा छळ फक्त पुरुषच करतात असे नाही. घरातील पुरुष व महिला सदस्य मिळून किंवा स्वतंत्रपणेही एखाद्या महिलेचा छळ करू शकतात व वास्तवात करतातही. सासू-सून, नणंद-भावजई, मुले आणि आई अशी घरातील स्त्री-पुरुषांची नाती असतात आणि हे सर्वजण परस्परांचा छळ करू शकतात. काही वेळा एखाद्या महिलेच्या छळात घरातील इतर सदस्यांपैकी पुरुष व स्त्रिया असे दोघेही सामील असतात. काही वेळा एक जण प्रत्यक्ष छळ करतो व दुसऱ्याची त्याला फूस असते. अशा परिस्थितीत वास्तवात छळामध्ये पुरुष व महिला दोघेही सामील असले तरी कायद्याच्या कक्षेत फक्त पुरुषांना आणून महिलांना वगळणे हे कायद्याच्या मूळ उद्देशास हरताळ फासणारे आहे.