पाठिंबा द्या; मंत्रिपद घ्या

By Admin | Updated: March 13, 2015 00:00 IST2015-03-13T00:00:47+5:302015-03-13T00:00:47+5:30

आम आदमी पार्टीच्या सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी गेल्या वर्षी दोनदा दिला होता

Support; Take the minister | पाठिंबा द्या; मंत्रिपद घ्या

पाठिंबा द्या; मंत्रिपद घ्या

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या सरकारला समर्थन देण्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजयसिंग यांनी गेल्या वर्षी दोनदा दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया व आपच्याच माजी आमदाराने अरविंद केजरीवालांवर घोडेबाजाराचा आरोप केल्यानंतर खान यांच्या दाव्यामुळे ‘आप’ संशयाच्या घेऱ्यात अडकला आहे.
केजरीवालांनी गेल्यावर्षी काँग्रेसच्या सहा आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप एक दिवस आधीच आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला होता. खान यांनी पुरावे सादर करावे, या शब्दांत संजय सिंग यांनी आव्हान दिले आहे. मी आणि काँग्रेसच्या पाच आमदारांनी समर्थन दिल्यास मला मंत्रिपद आणि अन्य पाच जणांना विविध मंडळांची अध्यक्षपदे देण्याचा प्रस्ताव या दोघांनी दिला होता, असा दावा आसीफ मोहंमद खान यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)


 

Web Title: Support; Take the minister