शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

झोपडप˜ीवासीयांना मालकी हक्काचे प˜े

झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे
नागपूर : ग्रामीण भागातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घराचे मालकीचे पट्टे शासनाने प्रदान करावे, अशी मागणी झोपडपट्टी संघर्ष समितीने केली आहे. पंचशीलनगर येथे झालेल्या नागरिकांच्या सभेत ही मागणी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी युवराज फुलझेले होते. याप्रसंगी अनिल वासनिक, राजकुमार वंजारी, रूपचंद गद्रे, चंद्रशेखर शुक्ला, शैलेंद्र वासनिक आदींनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात झोपडपट्टीवासीयांनीही आपल्या समस्या सांगून मालकी हक्काचे पट्टे मिळणे किती आवश्यक आहे, याचा उहापोह केला.
-------
रमाई संदेश यात्रेचा समारोप
नागपूर : स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्यावतीने काढण्यात येणाऱ्या रमाई संदेश यात्रेचा समारोप करण्यात आला. ही यात्रा ३,४१० कि.मी.चा प्रवास करून आली आहे. यात्रेचा समारोप दीक्षाभूमी येथे करण्यात आला. या यात्रेचे नेतृत्व राजकुमार वंजारी, मधुकर गजभिये, कमलेश वासनिक, ज्ञानदेव गजभिये यांनी केले. या यात्रेच्या निमित्ताने राज्यभर रमाईच्या त्यागमय जीवनाची माहिती आणि त्यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. यात्रेच्या प्रवासात ठिकठिकाणी रमाईच्या जीवनावर चित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
-------
वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन
नागपूर : हिंदू महासभेतर्फे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतिदिन टिळक पुतळा, महाल येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी फडके यांच्या प्रतिमेला मालार्पण केले. याप्रसंगी त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यकतृर्त्वावर प्रकाश टाकून त्यांच्या देशकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला हिंदू महासभेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमानंतर वंदे मातरम्चा जयघोष केला.
----------
खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाची पालकमंत्र्यांशी भेट
नागपूर : महाराष्ट्र खाटीक समाजाच्यावतीने पाचपावली अस्थायी मटन विक्रेत्याचे एक शिष्टमंडळ बाळकृष्ण लारोकर यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. याप्रसंगी त्यांना खाटीक समाजाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देऊन या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी समाजाच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात विजय ढोके, केशवराव माकोडे, विनोद ढोके, राजेराम दुर्गे, शिवलाल वानखेडे, रमेश तुमाने, मोतीलाल दुर्गे, संजय लारोकार आदींचा समावेश होता.