Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेशकडून दरमहा 1.5 कोटींची लाच, 81 तुरुंग कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:36 IST2022-07-10T15:36:50+5:302022-07-10T15:36:58+5:30
Sukesh Chandrashekhar: सुकेश चंद्रशेखरवर अनेक हायप्रोफाईल लोकांकडून खंडणी व फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो सध्या तिहार तुरुंगात कैद आहे.

Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेशकडून दरमहा 1.5 कोटींची लाच, 81 तुरुंग कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रोहिणी कारागृहातील सुमारे 81 तुरुंग कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 200 कोटींच्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून (Sukesh Chandrashekhar)दरमहा दीड कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कारागृह कर्मचाऱ्यांवर आहे. 15 जून रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सुकेश चंद्रशेखरच्या तुरुंगातून झालेल्या फसवणुकीचा खुलासा होण्यापूर्वीही अनेक तुरुंग अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
महाठग सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात बंद
महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत, परंतु तो बाहेरुन लोकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी सुकेश चंद्रशेखरला कारागृहातून पत्र पाठवताना पकडले आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगातील जेल क्रमांक 3 मध्ये बंद आहेत. डीजी (तुरुंग) संदीप गोयल म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एक नर्सिंग स्टाफ सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये सुकेश चंद्रशेखरकडून काही कागदपत्रे घेताना दिसला होता. कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता सुकेशने हे पत्र कुणाला तरी देण्यासाठी दिल्याचे समोर आले.