कर्नाटकात ऊसदर आंदोलन चिघळले; मुधोळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वाहने पेटवली-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:06 IST2025-11-14T16:06:11+5:302025-11-14T16:06:59+5:30
शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प

कर्नाटकात ऊसदर आंदोलन चिघळले; मुधोळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वाहने पेटवली-video
शिरगुप्पी : बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील संत कनकदास चौकात कर्नाटक राज्य रयत संघटनेमार्फत आंदोलन सुरूच आहे. प्रश्न चिघळला असून, मुधोळ येथे ऊस घेऊन कारखान्याकडे चाललेले ट्रॅक्टरसह १५ वाहने पेटवून दिली.
प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मुधोळ शहरातील व्यावसायिकांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ शहर बंदची हाक दिल्याने आज सकाळपासून शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. मुधोळ शहर बंदला सर्वच शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळता बंद राहिले.
यावेळी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
व्यापारी, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, ऑटो असोसिएशन सदस्यांसह जवळजवळ सर्व स्तरातून बंदला प्रतिसाद मिळाला. बंद असला तरी आंदोलनामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.